महाराष्ट्र
दिवसा घरफोडी करणा-या आंतरराज्यीय आरोपीस अटक५,५६,५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत :-स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांची कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक शैलेश खेङकर व त्यांच्या पथकाने केली दमदार कामगिरी..
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
सोलापूर : बार्शी पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिवसा व रात्री घरफोडीच्या गुन्हयाचे प्रमाण वाढले होते. त्या अनुषंगाने घरफोडींच्या गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणणेकामी मा.पोलीस अधीक्षक श्रीमती. तेजस्वी सातपुते व अपर पोलीस अधीक्षक श्री. हिम्मत जाधव यांनी वरीष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, स्थानिक गुन्हे शाखा यांना गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेशीत केले होते. त्याप्रमाणे वरीष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस उप-निरीक्षक शैलेश खेडकर यांचे पथकास आदेशीत केले होते.
नमुद पथकाने बार्शी हद्दीतील सदर गुन्हयांचे घटनास्थळास भेट देवुन गुन्हयाचा तपास सुरू केला.
बार्शी शहरात मालाविषयी गुन्हयाच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करीत भोसले चौक येथे आले असता गोपनिय बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की, परभणी येथील दोन संशयील इसम हे पांढ-या रंगाच्या इंडिका व्हिस्टा गाडी मधुन चोरीचे सोने विक्री करीता येरमाळा मार्गे बार्शी येथे येणार आहेत. मिळालेल्या बातमीनुसार पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर व पथक भोसले चौक, बार्शी येथे थांबले असता कुसंळम रोडने एक पांढ-या रंगाची इंडिका व्हिस्टा चारचाकी कार येत असताना दिसली. त्यानुसार सदर इसमांना त्यांचेकडील चारचाकी वाहनासह ताब्यात घेवुन त्यांचेकडे चौकशी केली असता, त्यांनी सांगितले की, त्यांनी मागील महिन्यात बार्शी येथील कॅन्सर हॉस्पीटल जवळ त्यांचे ताब्यातील इंडिका विस्टा गाडीने येवुन दिवसा घरफोडी करून त्यामधील
मिळालेले सोने विक्रीसाठी घेवुन जात आहोत. सदरबाबत अभिलेखाची खात्री केली असता त्याबाबत बार्शी शहर पोलीस ठाणे कडील गु.र.नं. ५१७/२०२१, भादवि कलम-४५४,४५७,३८० अन्वये गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली. सदर इसमांची अंगझडती घेतली असता त्यांचेकडे गुन्हयात चोरीस गेलेल्या मालापैकी ३३ ग्रॅम वजनाचे
सोन्याचे दागिने मिळुन आले. त्यानुसार सदर इसमांनी नमुद गुन्हा केल्याची खात्री झाल्याने त्यांच्याकडील ३३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, त्यांचे ताब्यातील गुन्हा करण्यासाठी वापरलेली कार व विवो कंपनीचा मोबाईल असा असा एकुण ५,५६,५००/- रू किमंतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अटक दोन आरोपींपैकी एका आरोपी विरूध्द यापुर्वी बीड, परभणी, तसेच हैद्राबाद, तेलंगना राज्य, गुलबर्गा, कर्नाटक राज्य असे विविध ठिकाणी गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्रीमती. तेजस्वी सातपुते , मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. हिम्मत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. सर्जेराव पाटील यांचे
नेतृत्वाखाली पोलीस उप-निरीक्षक, शैलेश खेडकर, सफौ. शिवाजी घोळवे, राजेश गायकवाड, पोलीस अंमलदार सलीम बागवान, मोहन मनसावाले, अन्वर अत्तार व चापोना/ केशव पवार यांनी बजावली आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा