महाराष्ट्र
मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डाॅ.नितीन थेटे ‘या’ पुरस्काराने होणार सन्मानित....
पोलीस महासंचालक,महाराष्ट्र राज्य,मुंबई यांचे कार्यालयाकडून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधून न्यायालयाकडून शिक्षा लागलेल्या प्रकरणातून एका प्रकरणाची निवड “सर्वोत्कृष्ट अपराधसिध्दी” या बक्षीसाकरीता प्रत्येक महिन्यामध्ये करण्यात येत असते.त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रत्येक महिन्यात शिक्षा लागलेल्या निवड प्रकरणांचे प्रस्ताव मागविण्यात येत असतात.त्यातून गुन्हयाचा तपास व शिक्षा लागण्यासाठी केलेले सर्वोच्च प्रयत्न या निकषांच्या आधारे एका गुन्हयाची निवड या बक्षीसाकरीता करण्यात येवून त्यास २५ हजार रूपये रोख रक्कम व प्रशिस्तीपत्र देण्यात येत असते.
सोलापूर (मंद्रूप) : माहे डिसेंबर २०२१ करीता मंद्रुप पोलीस ठाणे येथे भा.द.वि.क३७६(२),३०७,३९४ व पोस्को कायदा कलम ४,६,८ व १२ प्रमाणे या गुन्हयात आरोपीस जन्मठेपेची शिक्षा लागल्याने त्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.सदर गुन्हयाची डिसेंबर २०२१ या महिन्याकरीता राज्य स्तरावर “सर्वोत्कृष्ट अपराधसिध्द” या बक्षीसासाठी निवड करण्यात आलेली असून सदर गुन्हयाचे तपासी अंमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक डाॅ.नितीन थेटे व त्यांच्या तपास पथकातील सहाय्यक फौजदार विजयकुमार जाधव,पोलीस नाईक अविनाश पाटील यांना जाहीर करण्यात आले आहे.सलग २ महिन्यामध्ये सोलापूर ग्रामीण जिल्हयातील शाबीत गुन्हयात “सर्वोत्कष्ट अपराधसिध्दी” हे बक्षीस मिळाल्याबाबत पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते,पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांनी बक्षीसपात्र अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन केले असून सदरचे प्रशिस्तपत्रक व रक्कम संबंधीताना लवकरच सन्मानपूर्वक बहाल करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामीण पोलीस दलाकडून देण्यात आली आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा