महाराष्ट्र
गुंजेगाव,कंदलगाव ग्रामस्थ व डीएम ग्रुपच्या वतीने पत्रकार प्रा.डॉ.राजदत्त रासोलगीकर यांचा वाढदिवस साजरा..
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : दक्षिण सोलापूर तालुक्यातील पत्रकार, मितभाषी, आपल्या धारदार लेखणीच्या माध्यमातून समाजातील अपप्रवृत्तींवर प्रहार करणारे आणि अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देणारे पत्रकार प्रा.डॉ.राजदत्त रासोलगीकर यांचा वाढदिवस गुंजेगाव,कंदलगाव ग्रामस्थ तसेच डीएम ग्रुप च्या वतीने कंदलगाव येथील डीएम ग्रुपच्या कार्यालयात अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी गुंजेगावचे ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर साळुंके,युवा नेते अमीर शेख,दत्ता पवार,डी.एम.ग्रुपचे सद्दाम शेख,बाबू भैया सय्यद,लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे दक्षिण तालुका प्रतिनिधी सुशील बनसोडे,समाधान जाधव,इलाही शेख,रफिक नदाफ,डी.एम.ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विकास पाटील आदी उपस्थित होते.
यावेळेस ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर साळुंके,युवा नेते आमिर शेख,दत्ता पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा