महाराष्ट्र
सोलापूर जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचा सत्कार...
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर : सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्ह्यातील कार्यकर्ता पदाधिकारी यांना मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळा कार्यक्रमाच्या निमित्त सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे सोलापूर जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्यावतीने जंगी स्वागत करण्यात आले.
यावेळेस सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष वसीम पठाण, जिल्हा उपाध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस राशीद शेख, पश्चिम महाराष्ट्र सचिव अब्दुल रज्जाक कादरी, शहराध्यक्ष ज्येष्ठ नगरसेवक हाजी तोफिक हत्तुरे, जिल्हा सरचिटणीस अकबर शेख, अप्पू शेख, मौलाअली शेख, अमीर शेख, फिरोज पटेल, साजिद मकानदार ,शोएब शेख, शाहिद मुलवाड, यासीन शेख ,सलीम शेख, सद्दाम शेख, दावलजी मुल्ला आदी उपस्थित होते.
याप्रसंगी सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत व सक्रिय चळवळीतील कार्यकर्ते सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्यांक विभाग सरचिटणीस राशीद शेख यांची मौलाना आजाद आर्थिक विकास महामंडळ किंवा महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाच्या अध्यक्षपदी काँगेसच्या कोट्यातून नियुक्ती करून न्याय देण्यात यावे अशी विनंती प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्याकडे करण्यात आली.
यावेळी जिल्हा काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा