खोट्या प्रचाराला जनता बळी पडणार नाही ... मंत्री गिरीष महाजन
केंद्र शासनाकडून सर्व राज्यांना दिला जाणारा विकासनिधी हा राज्यघटनेच्या कलम २८० अन्वये १५ व्या वित्त आयोगाने ठरवून दिलेल्या प्रमाणातच दिला जातो. असे असतानाही प्रत्येक वेळी निधी वितरित झाल्यानंतर "महाराष्ट्रावर अन्याय झाला" अशी खोटी बातमी विरोधकांकडून पेरली जाते. हा संविधानाचा अपमान असून परिस्थितीची जाणीव असतानाही महाराष्ट्रातील जनतेची होणारी ही फसवणूक आहे.
मात्र, महाराष्ट्रातील जनता सुज्ञ असून विरोधकांच्या खोट्या प्रचाराला बळी पडणार नाही हा विश्वास आहे असे मंत्री गिरीष महाजन यांनी बोलताना सांगितले.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा