राहुलराॅय मुळे यांच्या उमेदवारीची जामनेर तालुक्यात चर्चा - ग्रामीण जनतेच्या आशा आणि अपेक्षा उंचावल्या - दैनिक शिवस्वराज्य

राहुलराॅय मुळे यांच्या उमेदवारीची जामनेर तालुक्यात चर्चा - ग्रामीण जनतेच्या आशा आणि अपेक्षा उंचावल्या

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर तालुक्यात, सर्वसामान्य जनतेच्या मनात राहुल रॉय मुळे यांनी आपल्या प्रामाणिक कार्याने एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यांच्या नावाचा आदर लोकांच्या मनात असून, त्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीत उतरण्याची जनतेची अपेक्षा आहे. यावर्षी होणाऱ्या निवडणुकीत राहुल मुळे हे जामनेर मतदारसंघातून अपक्ष म्हणून लढणार असल्याची चर्चा गावागावात रंगली आहे. त्यांच्या कर्तृत्वावर लोकांचा विश्वास असल्याने त्यांना मोठा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.राहुल मुळे यांच्या कार्यामुळे जामनेर तालुक्यातील ग्रामीण जनतेला अनेक समस्या सुटल्या आहेत. यामुळे त्यांना विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यास, त्यांनी ग्रामीण विकासाची गंगा आणण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे त्यांनी आपलं भविष्य आमदार राहुल मुळे यांच्या नेतृत्वात उज्ज्वल करण्याचं स्वप्न पाहिलं आहे.राहुल मुळे यांना राजकारणाचा दीर्घ अनुभव असून, त्यांनी आपल्या कर्तृत्वाने लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केलं आहे. त्यांच्या कार्यामुळे जनतेला मोठी मदत मिळाली असून, त्यांनी कधीही परतावा किंवा प्रसिद्धीची अपेक्षा केली नाही. त्यांची जनसेवा ही केवळ मानवतेच्या भावनेतून प्रेरित आहे.
सर्वसामान्य जनतेची इच्छा
आगामी विधानसभेच्या निवडणुकीत राहुल रॉय मुळे यांना लोकप्रतिनिधी म्हणून पाहण्याची इच्छा सर्वसामान्य जनतेने व्यक्त केली आहे. त्यांच्या कामगिरीवर जनतेचा विश्वास आहे, आणि ते विधानसभेत जाऊन लोकांच्या हितासाठी कार्य करतील अशी अपेक्षा आहे. राहुल मुळे हे सतत गोरगरीब जनतेला स्वतः मोल मजुरी करून त्याच्यामधली काही पैसे गोरगरिबसाठी मदतीसाठी खर्च करतात आणि जनतेच्या सुखा-दुखात सदैव धावून जातात.
Previous article
Next article

1 Comments

  1. राहुल भाऊ मुळे खूप मस्त काम करत आहे.. त्यांना आमदार व्हायची संधी भेटली पाहिजे.. हलीच्या काळात कोणी कोणाला मदत करत नाही... राहुल भाऊ नी मदतीचे कार्य सुरू केले आहे... फकत मत घायला आमदार गाडीच्या खाली उतरतात. निवडून आल्यावर गाडीच्या खाली सुद्ध उतरत नही ही खरी वास्तू स्तिती आहे.... जामनेर च भविष्य तरुणाच्या हातात आहे.. तेच म्हणजे राहुल भाऊ मुळे यांनी....

    उत्तर द्याहटवा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads