महाराष्ट्र
युवराज-सोमनाथ जोडीचा "हटके सामाजिक कार्य" ; मंद्रुप बाजारपेठेतील भाजी विक्रेते, व्यापारी खुश...
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : एकच ध्यास दक्षिण सोलापूरचा विकास या ब्रीद खाली सामाजिक कार्यातून आपली वेगळी छाप सोडणारे सोनाई फाउंडेशन आणि स्वयंम शिक्षा फाउंडेशनच्या वतीने आणखी एक नवा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात जितक्या खुल्या बाजारपेठ आहेत. भाजी विक्रेते आहेत, अशा तब्बल दोन हजार भाजी विक्रेत्यांनी युवराज राठोड आणि सोमनाथ वैद्य यांनी मोठ्या छत्र्याची सोय केली आहे. त्यामुळे दक्षिण सोलापूरच्या बाजाराबाजारात आता सर्वत्र याच छत्र्या पाहायला मिळत आहेत.
पावसाळ्यात डोक्यावर आसरा आणि उन्हापासून संरक्षण होण्यासाठी सावली आल्याने महिलांसह प्रत्येक विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे.
युवराज राठोड यांच्या सहकार्याने सोमनाथ वैद्य हे दक्षिण मधून विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहेत आणि त्यांना दक्षिण तालुक्यातून आता चांगला प्रतिसाद मिळत असलेले पाहायला मिळत आहे
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा