संतोष पवार यांना शहरी भागात उत्स्फूर्त प्रतिसाद ; नीलम नगर येथील जनसन्मान सभेत महिलांचा उसळला जनसागर.... - दैनिक शिवस्वराज्य

संतोष पवार यांना शहरी भागात उत्स्फूर्त प्रतिसाद ; नीलम नगर येथील जनसन्मान सभेत महिलांचा उसळला जनसागर....


समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर : वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोष पवार यांच्या प्रचारार्थ नीलम नगर येथील कलवल फंक्शन हॉलमध्ये झालेल्या भव्य जनसन्मान सभेला हजारो महिलांसह नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. हद्दवाढ भागातील नागरिकांच्या समस्या, विशेषतः पाणी, ड्रेनेज, रस्ते, वीजपुरवठा या मूलभूत सुविधांच्या अभावाबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. परिसरातील नागरिकांनी उस्फुर्त पणे भावी आमदार या भूमिकेतून स्वतः परिसरातील विविध समस्यांबद्दल चर्चा केली, यावेळी महिलांची संख्या ही वाखाडण्याजोगी होती, परिसरातील समस्यांना कंटाळूनच हा जनसमुदाय उपस्थित असल्याचे यावेळी अनेकांनी बोलून दाखवले, निधी आणण्याच्या केवळ दाव्यांवर समाधान मानणाऱ्या नगरसेवक आणि आमदारांनी आता पर्यंत जनतेच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप अनेक नागरिकांनी यावेळी केला.
    यावेळी संतोष पवार म्हणाले, "प्रस्थापित राजकारण्यांच्या स्वार्थी राजकारणाला बाजूला सारण्याची वेळ आली आहे. तालुक्याच्या विकासासाठी यंदा परिवर्तन घडवा. तसेच या सभेला संतोष पवार यांच्या सौभाग्यवती प्रिया संतोष पवार यांचीही उपस्थिती उल्लेखणीय होती, महिलांच्या दैनंदिन जीवनातील समस्या जाणून घेऊन त्यांना आश्वासित करून सोबत राहण्या विषयीचे आव्हान त्यांनी यावेळी केले तसेच "येत्या 20 नोव्हेंबर रोजी अनुक्रमांक "१२" व "गॅस सिलेंडर" चिन्हावर बटन दाबून संतोष पवार यांना विजयी करण्याचे आवाहनही केले."
  यावेळी माजी नगरसेविका अंबिका बोदु, समाजसेविका संगीता बिराजदार, समाजसेविका लक्ष्मी बंगारे, यांनी आपला जाहीर पाठिंबा असल्याचे जाहीर करून आपले विचार मांडले, या भव्य कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीचे आणि मार्ग फाऊंडेशनचे पदाधिकारी , कार्यकर्ते आणि परिसरातील हजारो नागरिक महिला आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती भरभरून होती.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads