महाराष्ट्र
दक्षिण'मध्ये मनसेचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांच्या सभा, पदयात्रा, कॉर्नर बैठकांना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद..... माझा प्रत्येक क्षण विकासासाठी समर्पित ; महादेव कोगनुरे
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर ः माझा प्रत्येक क्षण हा विकासासाठी समर्पित असेल. मी जिथे जातोय तिथे मतदारांचे प्रेम मला भरभरून मिळत आहे. हे प्रेम आणि होणाऱ्या गर्दीमुळे मला माझ्या विजयाचा विश्वास आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांनी केले. दक्षिण सोलापूरच्या ग्रामीण भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांच्या सभा, पदयात्रा, कॉर्नर बैठकांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
बुधवारी शहरात निघालेल्या पदयात्रेमध्येही हजारो नागरिक सहभागी झाले होते. गुरुवारी सायंकाळी निंबर्गी, तेलगाव भीमा, खानापूर, कुसूर विंचूर याठिकाणी कॉर्नर सभा आणि प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका झाल्या. यात महादेव कोगनुरे यांनी मतदान करण्याच्या केलेल्या आवाहनाला नागरिकांनी जोरदार प्रतिसाद दिला. महादेव कोगनुरे यांचा विजय असो, येऊन येऊन येणार कोण मनसे शिवाय आहेच कोण अशा घोषणांनी परिसर दुमदुमुन गेला. रात्री उशिरापर्यंत कार्यकर्ते आणि मतदार कोगनुरे यांची वाट पाहात होते. कोगनुरे यांचे आगमन होताच आतषबाजी करण्यात येत होती. पुष्पगुच्छ, पुष्पहार घालून कोगनुरे यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. महिलांनी औक्षण करून आशीर्वाद दिले.
आता विजय आपलाचशहरासह ग्रामीण भागातही महादेव कोगनुरे यांना मिळणारा प्रतिसाद पाहता आता विजय आपलाच अशा प्रतिक्रिया पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिल्या. कारखानदार, प्रस्थापित राजकारणी निवडून देण्यापेक्षा माझे मत प्रामाणिक कार्यकर्ता आणि जनसेवक असलेल्या महादेव कोगनुरे यांनाच देणार अशा प्रतिक्रिया मतदारांतून उमटू लागल्या आहेत.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा