महाराष्ट्र
मुख्यमंत्री ग्राम समृद्धी पंचायतराज अभियानांतर्गत वडापूर येथे समित्यांची निवड ...
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर : ग्रामविकासाला गती देण्यासाठी राज्य शासनाने राबवलेल्या मुख्यमंत्री ग्राम समृद्धी पंचायतराज अभियानांतर्गत वडापूर ता.द.सोलापूर येथे ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेत गावातील विविध समित्यांवर पदाधिकाऱ्यांची निवड एकमताने करण्यात आली.
या अभियानांतर्गत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य, शिक्षण, महिला-बालविकास, पर्यावरण, स्वच्छता, पाणीपुरवठा, कृषीविकास, सांस्कृतिक आदी विषयांवर विशेष समित्या स्थापन करण्यात आल्या. नव्या पदाधिकाऱ्यांकडून गावाच्या प्रगतीसाठी कार्यरत राहण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
गावातील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून वडापूर ग्रामसमृद्धीकडे वाटचाल करेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.
यावेळी अरूण पाटील सर,प्रमोद गुंड,गणपती पुजारी ,भानुदास गुंड,महेश पाटील,प्रभू पुजारी,तुकाराम गुरव ,गणेश लांडगे ,ओंकार पाटील ,पंकज पाटील,जकराया माशाळे आदी. व जेष्ठ नागरिक,माजी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवड प्रक्रियेत ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा