विजेचा शॉक लागून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू जामनेर तालुक्यातील पळसखेडा येथील घटना - दैनिक शिवस्वराज्य

विजेचा शॉक लागून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू जामनेर तालुक्यातील पळसखेडा येथील घटना

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर तालुका, पळसखेडा – शेतकाम करताना दुर्दैवी अपघातामध्ये एक तरुणाचा मृत्यू झाला आहे. माहितीप्रमाणे, पळसखेडा येथील अमोल सपाटे  हा शेतात फवारणी करत असताना विजेच्या अर्तींग वायरचा शॉक लागून जागीच ठार झाला. ही घटना काल दुपारी सुमारे 2 वाजता घडली.स्थानिकांनी तातडीने मदत करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला वाचवता आले नाही. अपघातानंतर परिसरात शोककळा पसरली असून, कुटुंबीय आणि शेजारी अत्यंत दुःखात आहेत.या घटनेने शेतकरी व परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षा उपायांचे महत्त्व विजेच्या वायर आणि शेतातील यंत्रसामग्रीसह काम करताना दक्षता घेणे अत्यंत गरजेचे आहे.





Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads