पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गुंजेगावचे समाजसेवक ज्ञानेश्वर साळुंके व विकास साळुंके पाटील यांचा पुढाकार....* - दैनिक शिवस्वराज्य

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गुंजेगावचे समाजसेवक ज्ञानेश्वर साळुंके व विकास साळुंके पाटील यांचा पुढाकार....*


समीर शेख प्रतिनिधी 
सोलापूर (मंद्रूप) : निसर्गाच्या बिघडलेल्या चक्रामुळे सीना नदीने विक्राळ व रौद्र रूप धारण केले असून, दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुंजेगाव येथे महापुराने अक्षरशः थैमान घातले आहे. शेतकऱ्यांचे पशुधन, शेती, पिके आणि घरे यांचे अतोनात नुकसान झाले असून बळीराजा शारीरिक, मानसिक व आर्थिक संकटात सापडला आहे.
     या कठीण प्रसंगी बळीराजाला धीर देण्याची व मदत करण्याची गरज ओळखून गुंजेगाव येथील ज्ञानेश्वर साळुंके व विकास साळुंके पाटील यांनी पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप केले आहे.
    या मदत कार्यावेळी गाव तंटामुक्त समिती अध्यक्ष सुभाष पवार, रामहरी पाटील, किरण आठवले (ग्रा. पं. सदस्य), संतोष गवळी-पवार, सोमनाथ पाटील, रामदास पवार, शिवाप्पा लोणारी आदी मान्यवर उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads