महाराष्ट्र
अंत्रोळी येथे ग्रामसभा संपन्न; समिती निवड, महत्त्वाचे ठराव व जनजागृती उपक्रम उत्साहात
समीर शेख प्रतिनिधी
अंत्रोळी : अंत्रोळी ता.द.सोलापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात दिनांक ११ सप्टेंबर रोजी ग्रामसभा संपन्न झाली.सभेला ग्रामपंचायत सदस्य,आरोग्य अधिकारी, पोलीस कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, कृषी अधिकारी तसेच ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
ग्रामसभेत गावातील विकासकामे, पाणीपुरवठा, स्वच्छता, शिक्षण आदी विषयांवर चर्चा झाली. शासनाच्या विविध योजनांची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली व ग्रामस्थांनी आपले प्रश्न व सूचना मांडल्या۔ तसेच ग्रामसभेत विविध ठराव दाखल करण्यात आले. गावातील विकासकामांना गती देणे, पाणीपुरवठा व्यवस्थापन सुधारणा, शाळांच्या सोयीसुविधा वाढविणे, स्वच्छता मोहीम राबविणे व तसेच तसेच ग्रामसभेत दारूबंदीबाबत ठराव दाखल करण्यात आला व या ठरावामुळे गावात व्यसनमुक्ती व सामाजिक सलोखा वृद्धिंगत होईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला व अशा अनेक ठरावांवर ग्रामस्थांनी आपली मते नोंदवली.
ग्रामसभेत महिला-बालकल्याण समिती, आरोग्य समिती, पाणीपुरवठा समिती, शिक्षण समिती आदी सर्व ग्रामपंचायत उपसमित्यांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. यामुळे ग्रामविकासाच्या विविध क्षेत्रांना बळकटी मिळणार असल्याचे मत सभेत व्यक्त करण्यात आले.
यावेळी अंत्रोळी आरोग्य केंद्र अधिकारी डाॅ. शिदे यांनी पावसाळ्यात पाणी स्वच्छ ठेवणे, उकळून पाणी पिणे व दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांपासून बचाव करण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच कृषी सहाय्यक संतोष साठे यांनी शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, पिकांची निगा राखण्याच्या पद्धती व शेतीसंबंधी विविध योजनांची माहिती दिली.
यावेळी संरपच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य व तसेच मंद्रूप पोलीस ठाण्याचे कर्मचारी, पोलीस पाटील, माजी सरपंच, अंत्रोळी आरोग्य केंद्र डॉक्टर व सेविका ,आशा वर्कर, अंगणवाडी शिक्षिका व कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सरपंच माया ब्रह्मदेव सलगरे यांनी ग्रामस्थांना सहकार्याचे आवाहन केले, तर ग्रामसेवक फडतरे यांनी कार्यवाही नोंदवून आभार मानले.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा