वाघारीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
वाघारीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत, स्वराज्याचे संस्थापक आणि रयतेचा राजा म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती वाघारी येथे मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी करण्यात आली.
१९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ला येथे राजमाता जिजाबाई आणि शहाजी राजे भोसले यांच्या पोटी जन्मलेल्या या महान पुरुषाने स्वराज्याची स्थापना करून इतिहासात अजरामर स्थान मिळवले. श्रीमंतयोगी, रयतेचा राजा, भूपती अशी अनेक बिरुदे त्यांना बहाल करण्यात आली आहेत. लोकांच्या मनावर राज्य करणारे शिवराय हे अद्वितीय योद्धे, दूरदृष्टीचे शासक आणि न्यायप्रिय राजे होते.
यावेळी वाघारी ग्रामपंचायत कार्यालय तसेच जिल्हा परिषद मराठी शाळा येथे महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सौ. माया मोहन खोनगरे यांच्या हस्ते तर उपसरपंच संदीप सरताळे यांच्या हस्ते महाराजांना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाला सरपंच सौ. माया मोहन खोनगरे, उपसरपंच संदीप सरताळे, मराठी शाळेचे मुख्याध्यापक चौधरी सर, शिक्षकवृंद, सामाजिक कार्यकर्ते योगेश गोसावी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश दसोरे, रमेश ठोंबरे, ग्रामपंचायत कर्मचारी, रोजगार सेवक, पत्रकार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवजयंती निमित्त उपस्थितांनी महाराजांच्या कार्याचा आदर्श घेऊन स्वच्छ, सुंदर आणि प्रगत गाव घडवण्याचा संकल्प केला. जय शिवरायच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा