महाराष्ट्र
दक्षिण सोलापूर पत्रकार संघटनेच्या पाल्यांना शालेय साहित्य वितरण ; सामाजिक बांधिलकी जपत सोनाई फाउंडेशनचा प्रेरणादायी उपक्रम...
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : पत्रकार समाजासाठी रात्रंदिवस काम करीत असताना त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावण्याचा स्तुत्य उपक्रम सोनाई फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात आला. फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष युवराज राठोड यांचे सुपुत्र आयुश राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त दक्षिण सोलापूर तालुका पत्रकार संघटनेच्या पत्रकारांच्या पाल्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे माजी सभापती गुरुसिद्ध म्हेत्रे होते. यावेळी मंद्रूपचे पोलीस उपनिरीक्षक राज डांगे, सरपंच अनिता कोरे, उद्योजक मिथुन मुगळे, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पंचाक्षरी स्वामी, काशीनाथ भतगुणकी, प्रदीप सुरवसे, ज्येष्ठ पत्रकार अमोगसिद्ध लांडगे, रज्जाक बागवान आदी उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांच्या ५४ पाल्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. प्रारंभी आयुश राठोड याचा आठवा वाढदिवस केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला.
गुरुसिद्ध म्हेत्रे म्हणाले, “मुलाच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबविण्याची संकल्पना प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणात मेहनत घेऊन मोठे यश संपादन करावे.”
पोलीस उपनिरीक्षक राज डांगे म्हणाले, “पत्रकार दिवस-रात्र समाजातील प्रश्न मांडत असतात; मात्र स्वतःच्या अडचणींकडे दुर्लक्ष करतात. पत्रकारांच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शालेय साहित्य वाटप करून युवराज राठोड यांनी सामाजिक जाणिवेचे उदाहरण घालून दिले आहे.
युवराज राठोड यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “जनतेच्या आणि पत्रकार बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत. आगामी काळातही सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविणार आहोत.” अशी ग्वाही दिली.
प्रास्ताविकात पंचाक्षरी स्वामी यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेत राठोड यांच्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी कार्यक्रमास बबलू शेख, समीर शेख, दिनकर नारायणकर, बालाजी वाघे, प्रमोद जवळकोटे, अशोक सोनकंटले, गुरू गायकवाड, अप्पू देशमुख, गिरमल्ल गुरव, बनसिद्ध देशमुख, अभिजित जवळकोटे, महेश पवार, राहुल उड्डाणशिव, आरिफ नदाफ, गजानन काळे, आनंद बिराजदार, शिवराज मुगळे, शिवय्या स्वामी, महासिद्ध साळवे, महावीर रणखांबे आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन प्रभू पुजारी यांनी केले तर आभार नित्यानंद वारे यांनी मानले.
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा