जामनेर पोलिसांची अवैध दारू विक्रेत्यांवर धडक कारवाई.. अवैध दारू विक्रेत्यांचे दणाणले धाबे
मा पोलीस अधीक्षक जळगाव डॉ महेश्वर रेड्डी, पोलीस उपअधीक्षक चाळीसगाव श्रीमती कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे यांच्या सूचनेनुसार जामनेर पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जामनेर पोलीस स्टेशनची आज दिनांक 24/03/2024 रोजी गावठी हातभट्टी दारू विरुद्ध विशेष धडक मोहीम सुरूच आहे या मोहिमेमध्ये सलग तिसऱ्या दिवशीही सहा ठिकाणी छापेमारी करून कार्यवाही करण्यात आली. यात अलकाबाई नाना कोळी रा. तळेगाव 1000 लिटर गाहाभची दारू तयार करण्याची कच्चे,पक्के रसायन अंदाजे 50 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल, शेळगाव शिवार १)अरुण सीताराम कोळी २)ईश्वर सीताराम कोळी दोन्ही रा.तळेगाव यात 400 लिटर गाहभची दारू तयार करण्याचे कच्चे,पक्के रसायन,अंदाजे 20हजार रुपये किमतीचा मुद्देमाल, शेळगाव शिवार गोकुळ पिंटू जोगी रा.भागदरा यांच्याकडून 400 लिटर गाहभची दारू तयार करण्याचे कच्चे पक्के रसायन अंदाजे 20 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल भागदरा शिवार प्रकाश सुभाष शिंदे रा.सामरोद यांच्याकडून 1200लिटर गाहभची दारू तयार करण्याचे कच्चे पक्के रसायन अंदाजे 60 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल सामरोद शिवार गजानन गंगाराम कोळी रा.सामरोद यांच्याकडून 400लिटर गाहभची दारू तयार करण्याचे कच्चे पक्के रसायन अंदाजे 20 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल गोविंदा कृष्णा ब्राम्हदे रा.सामरोद यांच्याकडून 1400लिटर गाहभची दारू तयार करण्याचे कच्चे पक्के रसायन अंदाजे 70 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल सामरोद शिवारातून जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री किरण शिंदे यांचे नेतृत्वात, पोउपनिरी सागर काळे पोहेका राकेश वराडे, रविंद्र बिर्हाडे मुकुंद पाटील, राजु तायडे, पोना/चंद्रशेखर नाईक पोशि ज्ञानेश्वर देशमुख, पांडुरंग पाटील, तुषार पाटील, निलेश घुगे, सचिन पाटील, राजेश लहासे, अमोल वंजारी,यांच्या पथकाने एकाच दिवसात सहा ठिकाणी धडक कारवाया करून सुमारे 2,40,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट केला आहे.पोलिसांनी अवैद्य गावठी दारू भट्ट्यांवर केलेल्या कार्यवाहीचे स्वागत होत असून अशीच धडक कारवाई या पुढेही करण्यात यावी अशी मागणी होत आहे..
Previous article
Next article
हप्ते बंद करा आधी
उत्तर द्याहटवाहप्ते बंद करा आधी
उत्तर द्याहटवा