महाराष्ट्र
महादेव कोगनुरे पोहचले शेतकर्यांच्या बांधावर....पीक नुकसान भरपाई मिळवून देण्याचे दिले शेतकर्यांना अश्वासन...
दक्षिण सोलापूर तालुक्यातील येळेगाव येथील शेतकर्यांच्या बांधावर पोहचून नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करताना महादेव कोगनुरे व शेतकरी बांधव...
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप): गेल्या आठवडाभरापासून दक्षिण सोलापूर तालुक्यात सतत पाऊस पडत आहे.या भागात कधी दमदार पाऊस तर कधी ढगफुटी सदृश सारखा पाऊस होत असल्याने या भागातील बहुसंख्य खरीप पिके सध्या पाण्यात उभा टाकल्याचे चित्र पहायला मिळत आहे.म्हणून आज एम के फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा दक्षिण सोलापूर तालुक्याचे जनसेवक महादेव कोगनुरे यांनी आज शेतकर्यांच्या बांधावर जाऊन खरीप पिकांची पाहणी करुन शेतकर्यांना धीर दिला.
यावेळी काॅग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच एम के फाऊंडेशन चे पदाधिकारी उपस्थित होते. सतत पडणार्या पावसामुळे सध्या खरीप पिके धोक्यात आल्याचे चित्र पहायला मिळत आहे.अशा वेळी महादेव कोगनुरे यांनी आज दक्षिण सोलापूर तालुक्यातील येळेगाव येथील शेतकर्यांच्या बांधावर जाऊन खरीप पिकांची पाहणी करुन हळहळ व्यक्त केली.यावेळी पीक नुकसानग्रस्त शेतकर्यांचे प्रश्न सरकारी दरबारी मांडून भरपाई मिळवुन देणार असल्याचे सांगितले.यावेळी उपस्थित शेतकर्यामधून समाधान व्यक्त करताना दिसून आले.यावेळी या भागातील बहुसंख्य शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतकरी बांधवांना वर्षभर शेतात काबाडकष्ट करावी लागते. परंतु दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते अशा नुकसानग्रस्त शेतकर्यांना न्याय देण्यासाठी मी प्रयत्न करणार :- महादेव कोगनुरे
Previous article
Next article
अनिकेतसणरे
उत्तर द्याहटवा