मनसेचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांचा झंझावती गावभेट दौरा ; दौऱ्याला गावा-गावातून मिळतोय भरघोस प्रतिसाद दक्षिण सोलापूरच्या विकासासाठी कटिबद्ध :- महादेव कोगनुरे - दैनिक शिवस्वराज्य

मनसेचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांचा झंझावती गावभेट दौरा ; दौऱ्याला गावा-गावातून मिळतोय भरघोस प्रतिसाद दक्षिण सोलापूरच्या विकासासाठी कटिबद्ध :- महादेव कोगनुरे


समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे. माझा प्रत्येक क्षण हा सामान्य नागरिकांच्या सेवेसाठी बांधील असेल असे मी तुम्हाला वचन देतो, असे सांगत रेल्वे इंजिन या चिन्हा समोरील बटन दाबून मला एक संधी द्या असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांनी केले.
     विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांचे झंझावती गावभेट दौरे सुरू आहेत. प्रत्येक गावात कोगनुरे यांचे पुष्पगुच्छ देऊन फटाक्यांच्या जोरदार आतषबाजीत जल्लोषात स्वागत होत आहे. कुठलेही पद नसताना राजकीय पार्श्वभूमी नसताना महादेव कोगनुरे यांनी केलेल्या समाजकार्याचे कौतुक होत आहे. यंदा माझे मत महादेव कोगनुरे यांनाच देणार अशी प्रतिक्रिया प्रत्येक मतदार व्यक्त करत आहे.
   रविवारी दि.10 रोजी महादेव कोगनुरे व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या ताफ्याने बोरुळ, कणबस, शिरवळ, इंगळगी, हिपळे, सावतखेड, वांगी, मनगोळी, गावडेवाडी, गुंजेगाव, कंदलगाव, अकोले आदी गावात दौरे केले.
गावभेट दौऱ्यादरम्यान महादेव कोगनुरे म्हणाले की आपल्याला नवनिर्माण करायचे असेल तर प्रस्थापित राजकारण्यांना धक्का देऊन माझ्यासारख्या प्रामाणिक आणि जनसेवेची इच्छा असणाऱ्या कार्यकर्त्याला तुम्ही एक संधी द्या. आतापर्यंत तुमचा अपेक्षाभंग झाला आहे. मला निवडून दिल्यानंतर तुम्हाला अभिमान वाटेल असेच कार्य माझ्या हातून होईल याची खात्री देतो.
    ज्येष्ठ नागरिकांचे कोगनुरे यांना आशीर्वाद महादेव कोगनुरे यांचे जोरदार होणारे गाव भेटदौरे आता विरोधकांच्या तोंडचे पाणी पळवत आहेत. दौऱ्याला होणारी तरुणाईची गर्दी आणि सर्वसामान्य नागरिकांचा वाढता प्रतिसाद मतदारसंघातून कोगनुरे हेच विजयी होणार हे दर्शवत आहे. ज्येष्ठ महिला आणि नागरिक ही कोगनुरे यांचे तोंड भरून कौतुक करत आशीर्वाद देत आहेत.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads