स्वाधार योजनेची 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ ; विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन... - दैनिक शिवस्वराज्य

स्वाधार योजनेची 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ ; विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन...


समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर :-: सामाजिक न्याय विशेष सहाय विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबैध्द प्रवर्गातील शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या तथा शासकीय वसतिगृहात प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन आयुक्त समाज कल्याणचे सहाय्यक सुलोचना सोनवणे यांनी केले आहे.
     महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना लागू करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वस्तीगृहामध्ये प्रवेश मिळू शकला नाही. त्या विद्यार्थ्यांना खाजगी स्तरावर राहण्यासाठी भोजन निवास व इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणारी ही योजना आहे
             शैक्षणिक वर्ष 2024-25 या शैक्षणिक वर्षात सोलापूर शहरातील व सोलापूर महानगरपालिका हद्दीपासून 5 किमी परिसरात असलेल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील पात्र नवीन व नुतनीकरण झालेल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी http://hmas.mahait.org या पोर्टलवर दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजी पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण सुलोचना सोनवणे यांनी केले आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads