जामनेर पोलिसांकडून नववर्षानिमित्त नागरिकांना सूचना
जामनेर: नववर्षाच्या पार्श्वभूमीवर जामनेर पोलीस स्टेशनकडून नागरिकांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन, गोंधळ घालणे, आरडाओरड करणे किंवा दारू पिऊन वाहन चालवणे यासारखी कृत्ये आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल.
नागरिकांनी नववर्ष संयम आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरे करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी केले आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा