जामनेर तालुक्यात विविध ठिकाणी अवैध गौण खनिज वाहतूकविरोधात महसूल व पोलिस विभागाची धडक कारवाई...
जामनेर, ता. 29 डिसेंबर – जामनेर तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतुकीवर आळा घालण्यासाठी महसूल व पोलिस विभागाच्या संयुक्त पथकाने रात्री विविध ठिकाणी धडक कारवाई केली. या मोहिमेचे नेतृत्व तहसीलदार नानासाहेब आगळे आणि पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी केले.
नेरी येथे कारवाई
नेरी येथे महसूल आणि पोलिस विभागाच्या पथकाने अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर धडक कारवाई केली. मोहिमेत तहसीलदार नानासाहेब आगळे, पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार, मंडळ अधिकारी, तलाठी आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
देवपिंपरी येथील वाघूर नदी पात्रात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूकविरोधात महसूल व पोलिस विभागाने गस्त घालून तपासणी केली.
शेंदुर्णी येथे धडक मोहीम
शेंदुर्णी येथे महसूल आणि पोलिस विभागाने अवैध गौण खनिज वाहतुकीविरोधात संयुक्त कारवाई केली. तहसीलदार नानासाहेब आगळे, पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार, मंडळ अधिकारी, तलाठी आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी मोहिमेत भाग घेतला.
पालधी येथे १ ट्रॅक्टर जप्त
पालधी येथे महसूल आणि पोलिस विभागाच्या संयुक्त पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर जप्त केला. या कारवाईत तहसीलदार नानासाहेब आगळे, पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार, मंडळ अधिकारी, तलाठी आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
या धडक कारवाईमुळे अवैध खनिज वाहतूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे. तहसीलदार नानासाहेब आगळे आणि पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी अवैध वाहतुकीविरोधात कठोर पावले उचलण्याचा इशारा दिला आहे.
नागरिकांनी अवैध गौण खनिज उत्खननाची माहिती महसूल आणि पोलिस विभागाला तात्काळ कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा