भाजप सदस्य नोंदणी अभियान कार्यशाळा बैठक उत्साहात – कार्यकर्त्यांची ताकद पक्षवाढीचा पाया: ना. गिरीश महाजन
जामनेर (ता. १ जानेवारी)भारतीय जनता पक्षाचे सदस्य नोंदणी अभियान संपूर्ण देशभरात उत्साहात सुरू आहे. पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जामनेर येथील श्रीमंत बाबाजी राघो पाटील मंगल कार्यालयात सदस्य नोंदणी अभियान कार्यशाळा बैठक आयोजित करण्यात आली.या बैठकीत जलसंपदामंत्री ना. गिरीश महाजन यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत पक्षवाढीसाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत असे आवाहन केले.बैठकीत ना. गिरीश महाजन यांनी सांगितले की, भाजपचा खरा कणा म्हणजे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या मेहनतीवर पक्षाची प्रगती अवलंबून आहे. प्रत्येक गाव, वाडी आणि तांड्यात भाजपची विचारधारा पोहोचवण्यासाठी सर्वांनी अथक परिश्रम करावेत.
पक्षाच्या मूलभूत तत्त्वांची जपणूक आणि सदस्य नोंदणी अभियानाला गती देण्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना प्रेरित केले. महाजन यांनी सांगितले की, पक्षाने दिलेली संधी ही जबाबदारी आहे. आपल्याला लोकांपर्यंत पोहोचून पक्षाच्या धोरणांबाबत जनजागृती करावी लागेल.
बैठकीत भाजपा तालुकाध्यक्ष चंदू बाविस्कर, प्रा. शरद पाटील, शिवाजी सोनार, संजयदादा गरुड, छगन झाल्टे, शेखर काळे, नवल पाटील, रवींद्र झाल्टे, अतिश झाल्टे, केतकीताई पाटील,डॉ. प्रशांत भोंडे, नाझीम पार्टी, राजमल भागवत, तसेच तालुका आणि शहरातील भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यशाळेच्या निमित्ताने नेरी गावातील अनेक नागरिकांनी भाजपमध्ये प्रवेश करून पक्षाच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त केला. ना. गिरीश महाजन यांनी पक्षात नव्याने दाखल झालेल्या सदस्यांचे स्वागत केले आणि पक्ष बांधणीसाठी सक्रिय योगदान देण्याचे आवाहन केले.बैठकीत आगामी ५ जानेवारी रोजी व्यापक स्वरूपात सदस्य नोंदणी अभियान राबवण्याचा संकल्प करण्यात आला. या अभियानाला यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी पूर्ण तयारीने उतरावे, असे निर्देश ना. महाजन यांनी दिले.
बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांनी विविध प्रश्न मांडले. त्यावर सकारात्मक चर्चा करत ना. महाजन यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पक्षसंघटन अधिक मजबूत करण्यासाठी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनी सक्रिय राहावे, असे ते म्हणाले. त्यांनी सदस्य नोंदणी मोहिमेच्या महत्त्वावर भर देत घराघरात भाजप हा मंत्र रुजवण्याचे आवाहन केले.
बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. उपस्थितांनी पक्षाच्या वाढीसाठी आणि अभियानाच्या यशासाठी कार्य करण्याची तयारी दर्शवली. पक्षवाढीसाठी जोमाने काम करू असे आश्वासन सर्व पदाधिकाऱ्यांनी दिले.
ना. गिरीश महाजन यांनी सांगितले की, पक्षाचे धोरण आणि योजना लोकांपर्यंत पोहोचवणे ही प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे. भाजपचा विकासदर्शक दृष्टिकोन आणि सुसंगठित कार्यपद्धती हीच यशाची गुरुकिल्ली आहे.बैठकीच्या शेवटी सर्वांनी एकत्र येऊन ५ जानेवारीला भव्य स्तरावर सदस्य नोंदणी अभियान राबवण्याचा निर्धार केला. कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करून भाजपचा विचार दूरवर पोहोचवण्याचे वचन दिले.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा