महाराष्ट्र
नॕशनल हायवे क्रमांक 61 मानवतरोड ते परभणी बंद पडलेले काम त्वरीत चालू करा
प्रतिनिधी : - बालाजी गोरे
मानवत : - नॕशनल हायवे क्रमांक 61 मानवतरोड ते परभणी बंद पडलेले काम त्वरीत चालू करा अशी मागणी परभणी वकील संघाच्या वतीने जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. नॕशनल हायवे क्रमांक 61 मानवतरोड ते परभणी या रस्त्याच्या कामाचे टेंडर निघून 4 वर्षाचा कालावधी निघून गेला टेंडरच्या नियमानुसार कामाचा कालावधी संपला आहे. तरीदेखील अद्यापही या रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. जे काम चालू आहे ते केवळ खोदून ठेवलेले आहे. त्यामुळे रस्त्यावर प्रचंड धूळ उडत आहे व रस्त्यावरील खांदल्यामुळे अपघाताचे प्रमाणदेखील वाढले आहे. त्यामुळे नागरिकांना व वाहनधारकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या पंधरा दिवसापासून या रस्त्याचे काम पूर्णतः बंद आहे. त्यामुळे कामावर प्रशासनाचे कुठलेच नियंत्रण नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे मानवतरोड ते परभणी बंद पडलेले रस्त्याचे काम त्वरित चालू करा. अन्यथा लोकलढा उभारावा लागेल. असा इशारा जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. निवेदनावर अॕड. भारत चिलवंत, अॕड.सुनिल जाधव, अॕड.राजेश चव्हाण, अॕड.शैलेश पाटील, अॕड.कैलास पवार, अॕड.विनायक चोखट, अॕड.अंगद बारहाते, अॕड.रमाकांत शिंदे, अॕड.के.एस.रेंगे, अॕड.डि.एस. साळवै, अॕड.बी.एल.यादव यांच्या सह्या आहेत.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा