पांगरे ग्रामस्थांकडून करमाळा तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवकांचा सन्मान - दैनिक शिवस्वराज्य

पांगरे ग्रामस्थांकडून करमाळा तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवकांचा सन्मान



करमाळा प्रतिनिधी/अंगद भांडवलकर
     शिवनेरी प्रतिष्ठान व टायगर ग्रुप पांगरे यांच्या सहयोगाने आयोजित मानपत्र सन्मान कार्यक्रमात पांगरे ग्रामस्थांकडून आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला नोबेल पीस अवार्ड २०२० व अमेरिकन विद्यापीठातर्फे डॉक्टरेट पदवी मिळवल्याबद्ल तानाजी जाधव   राष्ट्रीय अध्यक्ष टायगर ग्रुप यांचा तसेच सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
             यावेळी पुढे बोलताना यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ करे पाटील म्हणाले की, करमाळा तालुका हा ऐऱ्या गैऱ्याचा तालुका नसून करमाळा तालुक्यातुन  शैक्षणिक, राजकीय, चित्रपट निर्मिती, खेळाडू, पोलीस आदी क्षेत्रात युवकांनी मोठ्या प्रमाणावर यश मिळवले आहे.याप्रसंगी तानाजी जाधव यांच्यासह इतर मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
       या कार्यक्रमाला स्वाभिमान संघटना जिल्हाध्यक्ष संजय गुटाळ (माजी उपसरपंच,पांगरे), शब्बीर मुलाणी(कंदर), भैरवनाथ हराळे, पिंटू दादा पाटील, नितीन पारेकर, अमोल पाटील, गहिनीनाथ गुंजाळ, भारत टेकाळे, संतोष गुटाळ, राहुल गुटाळ, अमोल कुलकर्णी, पंढरीनाथ गुरव, राजेंद्र गुरव, टायगर ग्रुप, पांगरे ग्रामस्थ व युवक आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संदीपान गुटाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन संजय गुटाळ यांनी केले.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads