महाराष्ट्र
नवीन पनवेल चे शिवसेना उप विभागीय प्रमुख प्रशांत जाधव यांना जीवे मारण्याची धमकी
सविस्तर माहिती अशी की सोमवारी सकाळी ११.०० वाजता फोन करून अज्ञात व्यक्तीने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. कोणत्या कारणाने जीवे मारण्याची धमकी दिल्या गेली याची माहिती उलगडली नाही सध्या. परिस्थितीत प्रशांत जाधव यांनी असे सांगितले की मी अशा पोकळ धमक्यांना घाबरणार नाही आणि मी पक्ष बळकट करण्यासाठी काबाडकष्ट करून शिवसेना पक्ष भक्कम करण्याची प्रयत्न करत राहणार कोणी कितीही धमक्या दिल्या तर मी शिवसैनिक आहे सदैव शिवसेनेसाठी काम करणार.
जाधव यांनी अज्ञात फोन कॉल विरोधात पलूस पोलिसात तक्रार दिली आहे. धमकी देणाऱ्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी मागणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे त्यांनी केली आहे.
जर आरोपीला अटक नाही झाली तर पलूस पोलीस स्टेशन बाहेर ठीया आंदोलन करणार असे सांगितले. आता पलूस पोलीस प्रशासन या प्रकरणाला किती गांभीर्याने घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेे
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा