करमाळा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर;तर आ.संजय मामा शिंदे यांच्या हस्ते नवीन पदाधिकाऱ्यांचा सत्कार - दैनिक शिवस्वराज्य

करमाळा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर;तर आ.संजय मामा शिंदे यांच्या हस्ते नवीन पदाधिकाऱ्यांचा सत्कार


करमाळा प्रतिनिधी/अंगद भांडवलकर
           करमाळा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ करमाळा तालुक्याचे विद्यमान आमदार संजय मामा शिंदे यांच्या संपर्क कार्यालयात पार पडला. यावेळी सोलापूर जिल्हा सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल पश्चिम भागाचे युवक नेते गौरव झांजुर्णे, करमाळा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी झरे गावचे युवा नेते प्रशांत भैय्या पाटील, राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्षपदी साडे गावचे युवक नेते मयूर भैया पाटील या नवीन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करमाळा तालुक्याचे विद्यमान आमदार संजय मामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. सदर सत्कार समारंभ आ. संजय मामा शिंदे यांच्या करमाळ्यातील संपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आला होता.
          यावेळी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चंद्रकांत काका सरडे, आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक तानाजी बापू झोळ, आदिनाथ कारखान्याचे विद्यमान संचालक चंद्रहास बापू निमगिरे, जेऊर गावचे युवक नेते माणिक दादा पाटील, कुकडी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुजित तात्या बागल, माजी जि.प. सदस्य उद्धव (दादा) माळी, राष्ट्रवादीचे युवक नेते अभिषेक आव्हाड इत्यादी सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads