पालकमंत्री यांचा 29 व 30 एप्रिल रोजीचा यवतमाळ जिल्हा दौरा - दैनिक शिवस्वराज्य

पालकमंत्री यांचा 29 व 30 एप्रिल रोजीचा यवतमाळ जिल्हा दौरा



    संजय कारवटकर यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी, 7499602440                              यवतमाळ, दि. 28 : राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे हे यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.
            गुरुवार दिनांक 29 एप्रिल 2021 रोजी दुपारी 3.15 वाजता नागपूर विमानतळ येथून करंजी ता. पांढरकवडाकडे प्रयाण. सायंकाळी 4.45 ते 5 वाजता करंजी येथील ग्रामीण रुग्णालयास भेट व पाहणी. पांढरकवडाकडे प्रयाण. सायंकाळी 5.20 ते 5.35 वाजता पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालय भेट व पाहणी, मारेगावकडे प्रयाण, सायंकाळी 6.10 ते 6.25 वाजता मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालय भेट व पाहणी. वणीकडे प्रयाण. सायंकाळी 6.50 ते 7.15 वाजता वणी येथील ग्रामीण रुग्णालय भेट व पाहणी. यवतमाळकडे प्रयाण. रात्री 21.15 वाजता शासकीय विश्रामगृह यवतमाळ येथे आगमन, राखीव व मुक्काम.
            शुक्रवार दिनांक 30 एप्रिल 2021 रोजी सकाळी 9.20 वाजता शासकीय विश्रामगृह यवतमाळ येथून स्त्री रुग्णालयकडे प्रयाण. सकाळी 9.30 ते 10 वाजता स्त्री रुग्णालय भेट व पाहणी. जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळकडे प्रयाण. सकाळी 10 ते 11 वाजता खरीप हंगाम पूर्व तयारी आढावा बैठक. सकाळी 11 ते 12 वाजता जलजीवन मिशन आराखडा मंजुरी संदर्भात बैठक, दुपारी 12 ते 1 वाजता यवतमाळ जिल्हा पाणी टंचाई आढावा बैठक. दुपारी 1 ते 2 वाजता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कामांचा आढावा बैठक. दुपारी 2 ते 3 वाजता शासकीय विश्रामगृह यवतमाळ राखीव. दुपारी 3 ते 4 वाजता जिल्हा नियोजन समिती व खनिज विकास निधी अंतर्गत आरोग्य विभागाच्या नियमित योजना व कोविड नियंत्रण उपाययोजना बैठक. दुपारी 4 ते 5 वाजता मनरेगा आढावा बैठक. सायंकाळी 5 वाजता शासकीय विश्रामगृह यवतमाळ येथे आगमन, राखीव व मुक्काम.

दैनिक शिवस्वराज्य वेब पोर्टल साठी जिल्हा तालुका तसेच गाव पातळीवर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे तरी इच्छुकांनी 9022324656 या नंबरवर संपर्क साधावा.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads