महाराष्ट्र
शिरूर ताजबंद येथील कोविड सेंटर लवकरच सुरू
---------------------------
लातूर ( प्रतिनिधी ) संतोष टाक : अहमदपूर मतदार संघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या प्रयत्नातून सुरू होत असलेल्या शिरूर ताजबंद येथील स्वामी विवेकानंद मुलीचे वसतिगृह येथे प्रस्तावित कोविड सेंटरचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आज या सेंटर वर 50 बेड उपलब्ध झाले असून आँक्सिजन पाईप लाईन चे काम पूर्ण झाले आहे. लाईट फिटिंगचेही काम पुर्ण झाले आहे. सध्या आवश्यक अशा इमारत बांधकाम, अग्निशमन आणी विद्युत विभागाचे परिक्षण चालू आहे. दोन दिवसात वैद्यकीय स्टाफ उपलब्ध होईल. त्यामुळे 1 मे महाराष्ट्र दिन यादिवशी या कोविड सेंटर सुरू होण्याची शक्यता आहे.
कोरोना रूग्णा साठी सुरु होत असलेल्या आँक्सिजन युक्त 50 बेड च्या रुग्णालयाची पाहणी महाराष्ट्र राज्याचे माजीमंत्री मा.बाळासाहेब जाधव साहेब, उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, धन्वंतरी आयुर्वेद महाविद्यालय उदगीर चे प्राचार्य दत्तात्रय पाटील, शिरूरचे तलाठी शाम कुलकर्णी, कोंडिबा पडोळे आदींनी केली.
दैनिक शिवस्वराज्य वेब पोर्टल साठी जिल्हा तालुका तसेच गाव पातळीवर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे तरी इच्छुकांनी 9022324656 या नंबरवर संपर्क साधावा.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा