झरी तालुक्यातील छोट्या- मोठया व्यापाऱ्याणी टाळेबंदी (लॉकडाऊन) बंद करा, प्रशासणाला आर्तसाद - दैनिक शिवस्वराज्य

झरी तालुक्यातील छोट्या- मोठया व्यापाऱ्याणी टाळेबंदी (लॉकडाऊन) बंद करा, प्रशासणाला आर्तसाद



संजय कारवटकर यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी, 7499602440

राज्य शासन तसेच जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या लाकडाउन ला आता तालुक्यातून जोरदार विरोध होताना दिसत आहे. आज येथील नगरपंचायत व तहसील कार्यालयावर व्यापारी असोसिएशन संघटना झरी यांनी धडक दिली. त्यामुळे आता लाकडाऊन विरोधात जनभोक्ष पाहायला मिळत आहे. कोरोणाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने 30 एप्रिल पर्यंत यवतमाळ जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात काही निर्बंध लादले आहेत.त्यामध्ये जीवनावश्यक बाबी वगळता सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे.मात्र त्यामुळे दुकान चालक व तिथे काम करणारे कामगार यांच्या उदरनिर्वाहाचा व त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. झरी तालुका हा अतिदुर्गम तालुका असून जिल्ह्यातील सर्वात लहान तालुका म्हणून ओळख आहे.तालुक्यातील बाजारपेठेत छोटे-मोठे व्यापारी व्यापार करतात तसेच, दिनाक ६ एफ्रील २०२१ पासून कुठल्याही प्रकारची पूर्वकल्पना नसताना अनियोजित टाळेबंदी करण्यात आली आहे.यामध्ये काही दुकानांना मुभा देण्यात आली आहे तर काहींना उपासमारीची वेळ येणार हे नाकारता येत नाही.कारण झरी तील छोटे-मोठे व्यापारी हे उधारी मध्ये सामान आणून विक्री करते आणि त्या वस्तूची विक्री करून आठवड्याला समोरच्या व्यापाऱ्यांना पैसे पाठवून आपले व्यवसाय चालवत असते,परंतु टाळेबंदी मुळे दुकान बंद असल्याने व्यापारी व तिथे काम करणारे कामगार यांचेवर उपासमारीची वेळ आली आहे.त्यामुळे याला अनुसरून व्यापारी संघटना झरी च्या वतीने लॉकडाऊन मागे घेण्यात यावे,दुकाने नेहमीप्रमाणे चालू देण्यात यावे,दुकान चालू असताना सरकारच्या नामनिर्देशनुसार कोविड-१९ चे काटेकोरपने पालन करण्यात येईल अशी ग्वाही येथील व्यापाऱ्यांनी दिली.करिता याला अनुसरून येथील व्यापाऱ्यांच्या वतीने मुख्यअधिकारी (नगरपंचायत कार्यालय झरी) यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. तसेच तहसीलदार झरी,जिल्हाधिकारी यवतमाळ,पोलीस स्टेशन पाटण,यांना माहितीस्तव निवेदन देण्यात आले आहे यावेळी प्रकाश जांभुळकर,जयंता ताजने, प्रमोद भांडेकर,भाऊराव चोधरी,नरेश डहाके, भोयर,उमेश झाडें व स्थानिक व्यापारी उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads