राष्ट्रीय
रेमडेसिव्हर
रेमडेसिव्हरच्या तुटवड्याला नागरिक जबाबदार : गृहमंत्री अमित शहा
देशभरात रेमडेसिवीरचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. देशात गरजेनुसार रेमडेसिवीरचे उत्पादन होत आहे. निर्यातबंदीचा निर्णय केवळ खबरदारी म्हणून घेतला आहे. परंतु, इंजेक्शनचा जो तुटवडा दिसतोय त्याला देशातील नागरिक जबाबदार आहेत. कारण लोकांना भीतीपोटी मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीर खरेदी केल्यामुळे हा तुटवडा झाल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमीत शाह यांनी स्पष्ट केले.
यावेळी शाह म्हणाले की, केवळ डॉक्टरांनी सांगितल्यानंतरच रेमडेसिवीरची खरेदी करावी असे आवाहनही शाहांनी यावेळी लोकांना केले. महाराष्ट्रासह इतर काही राज्यांनी रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवत असल्याचे सांगितले होते. तसेच, केंद्राने महाराष्ट्राला रेमडेसिवीर देण्यास मनाई केल्याचा आरोपही केला जात आहे.यापार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शाहा यांनी उपरोक्त माहिती दिली.
दैनिक शिवस्वराज्य वेब पोर्टल साठी जिल्हा तालुका तसेच गाव पातळीवर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे तरी इच्छुकांनी 9022324656 या नंबरवर संपर्क साधावा.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा