नवीन वाहनांच्या ऑनलाइन नोंदणीला ग्रीन सिग्नल - दैनिक शिवस्वराज्य

नवीन वाहनांच्या ऑनलाइन नोंदणीला ग्रीन सिग्नल


नव्याने विकत घेतलेल्या वाहनांच्या नोंदणीस ब्रेक लावण्यात आला होता.


मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने नवीन खरेदी होणाऱ्या वाहन नोंदणीला 1 मे पर्यंत ब्रेक लावण्यात आला होता. मात्र, शासन आदेशापूर्वी तसेच गुढीपाडवा सणानिमित्त विक्री झालेल्या वाहनांचे खरेदी विक्रीचे व्यवहार झाले आहेत. त्यामुळे अशा वाहनांची नोंदणी करण्याच्या सूचना परिवहन आयुक्तांनी दिल्या आहे. यामध्ये मोटार वाहन निरिक्षक वाहनांची पाहणी करणार नसून ऑनलाईन पद्धतीनेच या वाहनांची नोंदणी केली जाणार आहे.


राज्य शासनाने कडक निर्बंध लावण्यात आल्याने प्रादेशिक परिवहन विभागाने ही स्वतंत्र आदेश काढून फक्त ऑनलाईन कामकाज केल्या जाणार अशा सुचना काढल्या होत्या, त्याशिवाय नविन वाहनांची नोंदणी सुद्धा थांबविण्यात आली होती.


मात्र, परिवहन आयुक्तांच्या आदेशापुर्वीच खरेदी झालेली आणि गुढीपाडव्याचे औचित्त साधून खरेदी झालेल्या वाहनांची नोंदणी प्रलंबीत असल्याने अशा वाहनांची नोंदणी करण्याची मागणी राज्यातील वाहन वितरकांनी केली होती. त्यानुसार आता 13 एप्रील पुर्वी खरेदी झालेल्या वाहनांची नोंद करण्याचा मार्ग मोकळा झाला असून, परिवहन आयुक्तांनी तशी परवानगी दिली आहे.


यामध्ये नविन वाहनांच्या चॅसिस व इंजिन क्रमांकाच्या आधारे वाहन विक्रेत्याने ऑनलाईन अर्ज फॉर्म क्र. 2021 विमा पुरावा व पत्त्याचा पुरावा वितरकांनी प्रमाणीत केलेला अर्ज वाहन नोंदणीसाठी स्विकारल्या जाणार आहे. संपुर्ण अर्ज वाहन वितरकांना अर्जाची स्कॅन कॉपी कार्यालयाच्या ई-मेलवर पाठवायची आहे. तर वाहनांचे नोंदणी शुल्क व कर, वाहन 4.0 प्रणालीवर भरुन घेऊन, मोटार वाहन निरिक्षक व नोंदणी अधिकाऱ्यांने संगणकावर मान्यता दिल्या जाणार आहे.


शासन आदेशापुर्वीच वाहन विक्रेत्यांचे वाहन खेरदी व्यवहार झाले होते. तर गुढीपाडव्याच्या निमित्ताने सुद्धा नागरिकांनी वाहन खरेदी केली. अशा वाहनांची नोंदणी करण्यासाठी वितरकांनी मागणी केली होती. त्याप्रमाणे 13 एप्रील पुर्वी खरेदी झालेल्या वाहनांचीच नोंदणी होणार आहे.


- अविनाश ढाकने, आयुक्त, परिवहन विभाग


अशा आहे महत्त्वाच्या सूचना


- वाहन वितरकांनी कागदपत्रे तपासल्याच्या प्रमाणपत्रासोबत वाहनाच्या चॅसिस क्रमांकाची पेन्सिल प्रिंट व छायाचित्र कार्यालयाच्या ई-मेल पत्त्यावर पाठवावे.


- वाहन वितरकांनी वरील प्रमाणे अर्ज सादर करतेवेळी एक हमीपत्र सादर करावे.


दैनिक शिवस्वराज्य वेब पोर्टल साठी जिल्हा तालुका तसेच गाव पातळीवर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे तरी इच्छुकांनी 9022324656 या नंबरवर संपर्क साधावा.

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads