आजचे राशिभविष्य २०-०४-२०२१ - दैनिक शिवस्वराज्य

आजचे राशिभविष्य २०-०४-२०२१

आजचे राशिभविष्य २०-०४-२०२१

मेष :-
आजचा दिवस धावपळीचा असेल. आपण एखाद्या ऐतिहासिक स्थळाची किंवा कदाचित एखाद्या संग्रहालयाची भेट घेऊ शकाल, असे ग्रह सांगत आहेत. असे असले तरी आपणास आपल्या आरोग्याकडे थोडे लक्ष द्यावे लागेल असे गणेशाचे सांगणे आहे. संध्याकाळी स्वतःसाठी विश्रांती घेणे हितावह होईल.

वृषभ :-
आज आपले विचार, व्यावसायिक घडामोडीं पासून हळूच सरकून आपले घर व कुटुंबाकडे झुकत असल्याचे गणेशास दिसत आहे. आपण घरी लवकर जाण्याची शक्यता असून कुटुंबियांशी घरगुती समस्यांवर चर्चा करण्यात गर्क व्हाल. असे बहुदा संध्याकाळ नंतर आनंदी व खेळीमेळीच्या वातावरणात होण्याची शक्यता आहे. आपला पूर्ण दिवस आपल्या कुटुंबासाठी समर्पित करून आणखी काही करण्याचा विचार आपण कराल.

मिथुन :-
आज आपल्या प्रिय व्यक्तीस लग्नाची मागणी घालण्याची इच्छा व आवश्यक ती हिम्मत आपणात येईल. आज प्रभावी असा पेहराव आपण कराल. रात्री आपला पेहराव उत्तम असाच असेल ज्याने आपली अनुकूल अशी छाप पडेल. आपण दिलखुलास पणे आपल्या भावी जोडीदाराशी वार्तालाप कराल, जो आपल्यास अनुकूलच असेल.

कर्क :-
आपल्या मानसिक सामर्थ्यानुसार आपल्या आर्थिक स्थितीत आपण सुधारणा करू शकाल. आपण वैयक्तिक व व्यावसायिक जीवनात यशस्वी होऊ शकाल असे गणेशा सांगत आहे. आपल्यावर अनेक जवाबदाऱ्या व कामे सोपविण्यात येतील. तरीसुद्धा, संध्याकाळ पर्यंत आपण आपल्या कामातून वेळ काढू शकाल.

सिंह :-
आज नोकरीत व व्यवसायात चांगला दिवस आहे. व्यावसायिकांना आज मोठा फायदा होईल. दीर्घ काळ चालेल अशा व्यवसायाची बोलणी होतील. नोकरीतील व्यक्तींना पगारवाढ, बढती किंवा जास्तीचे पैसे मिळण्याची शक्यता आहे. आपणास कितपत काम झेपेल एवढेच बघा असा गणेशा आपणास सल्ला देत आहे.

कन्या :-
आज आपण अत्यंत महत्वाकांक्षी व प्रामाणिक मनःस्थितीत असाल. आपल्या शब्दांपेक्षा कृतीतून ते दिसून येईल. आपण आपल्या सावध नियोजन व काळजीपूर्वक अंमल बजावणीने त्यांचा वेग नक्की कराल. आपल्या कामा बद्धल वरिष्ठ व सहकाऱ्यांकडून खूप कौतुक व ओळख मिळण्याची आपणास अपेक्षा असल्याची शक्यता गणेशास वाटते.

तूळ :-
आज आपल्या कुटुंबियांसह आपण आनंदात दिवस घालवू शकाल असे गणेशा सांगत आहे. आपल्या प्रियव्यक्तीसह काही विलक्षण वेळ घालवून आपणास आनंद होईल. आपल्या अंतर्गत भावना आपल्या वैवाहिक जोडीदाराच्या अंतर्गत विचारात मिसळल्याने आपल्या दोघांचे संबंध अधिक दृढ होतील. एकमेकांच्या सहवासातील सुखद क्षणांचा आनंद लुटण्याचा सल्ला गणेशा आपणास देत आहे.

वृश्चिक :-
आज घर व काम ह्यात अचूक समतोल साधून आपण असामान्य व्यक्ती म्हणून स्वतःला प्रस्थापित करू शकाल. आपल्या बरोबरीच्या लोकांशी बौद्धिक चर्चा व विचार - विनिमय केल्याने आपणास वैचारिक खाद्य मिळेल. संध्याकाळी आपण कुटुंबीय व मित्रांसह आनंदात वेळ घालविण्याची अपेक्षा बाळगू शकता.

धनु :-
आज आपण खूप धुमधडाका सुरु कराल. एखादे अवघड काम अवघड मार्गानेच होते हे लक्षात ठेवा. तेव्हा दडपणाखाली न वावरता आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा सल्ला गणेशा देत आहे.

मकर :-
आपल्या सिद्धीमुळे आपले हात गगनाला लागतील. आपणास यश सहजपणे मिळू शकले तरी आपल्या नशिबाची परीक्षा घेण्याचा प्रयत्न न करण्याचा सल्ला गणेशा देत आहे. उद्याचा दिवस आजच्या सारखा नसेल तेव्हा आजच्या दिवसाचा शक्य तितका उपयोग करून घ्या. सामाजिक वर्तुळात आपल्या बुद्धीने व विनोदाने आपण सर्वाना प्रभावित कराल व त्यामुळे आज आपली लोकप्रियता वृद्धिंगत होईल.

कुंभ :-
आपण आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या भावनिक व वास्तविक बाजूंचा समतोल साधू शकाल. आपल्या कामाचा आपणास आनंद मिळून आपल्या वैयक्तिक जीवनास व्यावसायिक जीवनात आपण यशस्वीपणे मिसळू शकाल. आर्थिकदृष्ट्या कोणतीही मोठी समस्या नसली तरी एखाद्या क्षुल्लक गोष्टीचा आपल्या मनावर परिणाम होऊ शकतो, असे गणेशास वाटते.

मिन :-
अत्यंत प्रेमळ आमंत्रणामुळे आपण दूरवरच्या किंवा परदेशात प्रवास करण्यासाठी प्रेरित व्हाल. परदेशात स्थायी झालेले जुने मित्र किंवा नातेवाईक ह्यांच्याशी आपला संपर्क झाल्याने आपण आज आनंदित व्हाल. काही विशेष शिक्षण घेण्यासाठी किंवा कामासाठी परदेशात जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला असल्याचे गणेशा सांगत आहे.

दैनिक शिवस्वराज्य वेब पोर्टल साठी जिल्हा तालुका तसेच गाव पातळीवर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे तरी इच्छुकांनी 9022324656 या नंबरवर संपर्क साधावा.

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads