वाझेंचा कोर्टात हस्तलिखित लेटरबॉम्ब ; अनिल देशामुखांसह शिवसेना मंत्र्यांवर आरोप - दैनिक शिवस्वराज्य

वाझेंचा कोर्टात हस्तलिखित लेटरबॉम्ब ; अनिल देशामुखांसह शिवसेना मंत्र्यांवर आरोप


निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंची NIA तर्फे चौकशी सुरू आहे. कोर्टापुढे वाझेंनी सादर केलेल्या जबाबामधून आतापर्यंतच्या सर्वात धक्कादायक गोष्टी पुढे आल्या आहेत. वाझेंनाी कोर्टापुढे हस्तलिखित पत्र सादर केलं. त्यात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांनी आपल्याकडे 2 कोटींची मागणी केल्याचं वाझेनी सांगितलं आहे. त्याबरोबरच आणखी एका शिवसेना मंत्र्याचं नावही या जबाबात वाझेंनी घेतल्याने खळबळ उडाली आहे.

'निलंबन टाळायचं असेल तर दोन कोटी द्या', अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुखांनी आपल्याकडे केल्याचं वाझे यांनी म्हटलं आहे. 'आपल्याला एवढी मोठी रक्कम देता येणार नसल्याचं सांगितलं.

त्याबरोबरच अनिल देशमुखांनी प्रत्येक बारमधून साडेतीन लाख वसूल करून आणा', असंही सांगितल्याचं सचिन वाझेनी नमूद केलं आहे.


वाझेंच्या जबाबामध्ये शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांचंही नाव आहे. अनिल परब यांनीही आपल्याला खंडणी वसून करायला सांगितलं, असा खळबळजनक आरोप वाझेंनी कोर्टापुढे सादर केलेल्या पत्रातून केला आहे.


याची माहिती तत्कालीन पोलीस आयुक्तांना दिली होती. त्यांनी या सर्व बेकायदेशीर व्यवहारांपासून दूर राहण्यास सांगितलं होतं, असंही वाझेंनी म्हटलं आहे. त्यामध्ये अनिल देशमुखांनी तपास थांबवण्यासाठी 50 कोटी मागितले, असाही आरोप करण्यात आला आहे.


वाझेंचं हे पत्र NIA कोर्टाने फेटाळलं असून ते अधिकृत पद्धतीने नोंदवावं, असं कोर्टाने सांगितलं आहे. वाझेंनी अधिकृतपणे कबुलीजबाब नोंदवावा किंवा कायदेशीररीत्या जबाब द्यावा, अशी कोर्टाची अपेक्षा आहे.


परबांनी आरोप फेटाळले- 'मी नार्को टेस्टसाठीही तयार'


वाझेंनी पत्रात उल्लेख केलेत ते खोटे असल्याचं सांगत परिवहन मंत्री अनिल परब यांनी सगळे आरोप फेटाळले आहेत. 'मला बदनाम करण्यासाठी केलेले आरोप आहे. भाजपचे पदाधिकारी आम्ही तिसरा बळी घेऊ म्हणत होते. त्यामुळे भाजपने रचलेलं हे प्रकरण आहे. वाझे हे पत्र देणार आहे हे भाजपला आधी पासून माहीत होतं', असं अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.


'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांची शपथ घेऊन आणि माझ्या दोन्ही मुलींची शपथ घेऊन मी सांगतो की हे खोट आहे. मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या लोकांना बदनांकरण्याचा हा डाव आहे. माझी नार्को टेस्ट केली तरी मी सामोरा जायला तयार आहे. NIA, CBI, रॉ कुठलीही चौकशी लावली तरी मी तयार आहे', असं परब म्हणाले.

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads