Whatsapp वर बोलून असा पाठवा टेक्ट मेसेज
WhatsApp वर टाईप करून कंटाळले असाल तर, आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की तुम्ही WhatsApp वर बोलून टेक्स्ट मॅसेज करू शकता. यासाठी तुम्हाला कोणतेही थर्ड पार्टी अँप इंस्टोल करण्याची गरज नाही, त्याऐवजी आपल्याकडे आधीपासूनच स्मार्टफोनमध्ये हे वैशिष्ट्य आहे. ते सक्रिय करून कसे वापरू शकतो हे जाणून घ्या
व्हाईस टाइपिंग फीचरचा वापर करण्यासाठी सर्वात आधी खात्री करून घ्या की, हे फिचर तुमच्या फोनमध्ये पहिल्यापासून ऍक्टिव्ह आहे की नाही. हा गुगल फीचरचा कीबोर्ड आहे, जो एन्ड्रॉईड मोबाईलमध्ये पहिल्यापासून ऑन असतो. त्यासाठी WhatsApp वर जाऊन कोणतेही चॅट बॉक्स उघडा. त्यानंतर कीबोर्डमध्ये दिल्या गेलेल्या स्पेस बटणवर क्लिक करून पहा.(ज्यावर इंग्रजी लिहलेले असते) त्यानंतर स्क्रीनवर चॅट कीबोर्ड ऑप्शन उघडेल, ज्यामध्ये खाली गुगल व्हाईस टायपिंगचा पर्याय आहे. जर हा पर्याय दिसत नसेल तर, सेटिंग्जमध्ये जाऊन ऑन करावा लागेल.
सेटिंगमध्ये जाऊन करा अॅक्टिव्ह
व्हाईस टाइपिंग फीचर ऍक्टिव्ह नसेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल सेटिंग्जमध्ये जावे लागेल. त्यानंतर भाषा आणि कीबोर्ड पर्यायांवर जा आणि त्यानंतर वर्च्युअल कीबोर्डला सिलेक्ट करा. त्यानंतर मॅनेज कीबोर्डचा पर्याय निवडा आणि त्यामध्ये तुम्हाला व्हाईस टाइपिंगचा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक करा.
WhatsApp वर असा पाठवा बोलून मॅसेज
WhatsApp वर बोलून टेक्स्ट मॅसेज पाठविण्यासाठी स्पेस बटन दाबून ठेवा. त्यानंतर व्हाईस टाइपिंग पर्यायाची निवड करा आणि तुमचा संदेश बोला. आम्ही तुम्हाला सूचित करतो की, कोणताही संदेश बोलताना गती कमी ठेवा आणि प्रत्येक शब्द स्पष्ट बोला. जर तुम्हाला वाटत असेल की व्हाईस टाइपिंग मॅसेज हिंदीत टाईप व्हावा तर, कीबोर्डवर माईक आयकॉनजवळ दिल्या गेलेल्या सेटिंग्ज आयकॉनवर क्लिक करा आणि हिंदी अथवा तुमची आवडती भाषा निवडा. त्यांतर पुन्हा मागे या आणि जेव्हा बोलून टेक्स्ट मॅसेज टाईप कराल तेव्हा हिंदी लिपीमध्ये टाईप होताना दिसेल.
कीबोर्डमध्ये हिंदी भाषा कशाप्रकारे समाविष्ट कराल
जर तुम्ही इंग्लिश कीबोर्डच्या जागी हिंदी कीबोर्डमध्ये टाईप करणार असाल तर त्यासाठी तुम्हाला मोबाईलच्या सेटिंग्जमध्ये जावे लागेल. तेथे भाषा आणि इनपुट या पर्यायांची निवड करावी लागेल. त्यानंतर भाषा हा पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करा. त्यांतर एड लँग्वेज वर जा आणि तुमची आवडती भाषा सर्च करा आणि त्या भाषेला तुमच्या कीबोर्डमध्ये समाविष्ट करा.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा