मनमानी करणाऱ्या शाळांवर कारवाई झालीच पाहिजे ! - दैनिक शिवस्वराज्य

मनमानी करणाऱ्या शाळांवर कारवाई झालीच पाहिजे !


पुणे प्रतिनिधी-श्री जयसिंग शिंदे,

आज दि-17/05/2021,रोजी राज्यातील विविध शाळांच्या मनमानी शुल्क वसुली विरोधात आज पुण्यातील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर पालकांसमवेत आंदोलन केलं. यावेळी मा.आमदार श्री योगेश(आण्णा)टिळेकर व सावित्री सन्मान फाउंडेशनचे प्रतिनिधी आणि विद्यार्थ्यांचे पालक आंदोलनात सहभागी झाले होते.

आंदोलनाद्वारे करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या...

१) विद्यार्थी ऑनलाईन माध्यमातून शिक्षण घेत असताना शुल्कवाढ केलेल्या शाळांवर कारवाई करण्यात यावी.

२) पालकांच्या आर्थिक परिस्थितीमुळे शाळांचे शुल्क न भरल्यामुळे दाखले दिलेल्या शाळांवर कारवाई व्हावी.

३) प्रत्येक शाळांचे दर तीन महिन्यांनी ऑडिट व्हावे.

४) शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या खर्चाच्या प्रमाणातच शाळेमार्फत शुल्क आकारण्यात यावे.

६) हॅचिंग शाळेमार्फत ऑनलाइन अभ्यासक्रम व परीक्षा बंद करून प्रगतीपुस्तक न देता विद्यार्थ्यांना नापास ठरवल्याबद्दल शिक्षण प्रशासनाने शाळेवर फौजदारी गुन्हा दाखल करावा.

७) सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अवहेलना करणाऱ्या शासन व शिक्षण खात्याविरोधात सावित्री सन्मान फाउंडेशन खटला दाखल करणार.

पालकांच्या हिताच्या आणि रास्त मागण्यांवर तातडीने निर्णय झाला नाही, तर आणखी उग्र आंदोलन करण्यात येईल, याची शिक्षण विभागाने नोंद घ्यावी.


दैनिक शिवस्वराज्य वेब पोर्टल साठी जिल्हा तालुका तसेच गाव पातळीवर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे तरी इच्छुकांनी 9022324656 या नंबरवर संपर्क साधावा.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads