महाराष्ट्र
विना मास्क फिरणाऱ्यांची कोरोना तपासणी
द.सोलापूर तालुका प्रतिनिधी समीर शेख
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रभाकर शिंदे आणि मंद्रूप पोलीस ठाण्याचे सपोनि नितीन थेटे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून ...
रांगेत उभे करून विना मास्क फिरणाऱ्यांची कोरोना तपासणी
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रभाकर शिंदे आणि मंद्रूप पोलीस ठाण्याचे सपोनि नितीन थेटे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून कारवाई केली .
कारणाशिवाय फिरणाऱ्या तसेच मास्कचा वापर न करणाऱ्या ३५ नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले पोलीस ठाण्यात त्यांना सभ्य भाषेत समज देण्यात आली पुन्हा ही चूक न करण्याची तंबी दिली. या नागरिकांना पोलिस ठाण्यातून रांगेने मंद्रूपच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.
या नागरिकांची ग्रामीण रुग्णालयात कोरोना चाचणी घेण्यात आली रॅपिड चाचणीत सर्वच जण निगेटिव्ह असल्याचा अहवाल आल्याने त्यांना सोडून देण्यात आले. दरम्यान त्यांना मंद्रूप पोलीस ठाण्याच्या परिसरात बसवून त्यांचे प्रबोधन करण्यात आले.
दैनिक शिवस्वराज्य वेब पोर्टल साठी जिल्हा तालुका तसेच गाव पातळीवर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे तरी इच्छुकांनी 9022324656 या नंबरवर संपर्क साधावा.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा