महाराष्ट्र
शिवसेना दारव्हा तालुकाच्या वतीने आ.संजय राठोड यांच्या संकल्पनेतुन कोरोना रुग्णांना सकस आहार व सुकामेवा वाटप
संजय कारवटकर यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी, 7499602440
यवतमाळ/दारव्हा : कोरोना रुग्णांचा वाढता प्रसार पाहता दिवसेंदिवस रुग्ण संख्येत भरच पडत आहे. प्रशासन यामध्ये रात्रंदिवस कार्यरत जरी असली तरी प्रत्येक रुग्णांना आवश्यक तो सकस आहार सर्वांच्या हातात पोहोचणे अशक्यप्राय आहे. या रोगाची लागन झाली असता अनेक गरिब, श्रीमंत रूग्ण रुग्णालयात दाखल होतात. या बिमारीची तिव्रता पाहुन आर्थिकद्रुष्ट्या सक्षम असणारी रूग्ण स्वतःला खाजगी रूग्णालयात दाखल होतात. आणि आपली प्रतिकार शक्ति वाढविण्याकरिता सकस आहार घेतात. परंतू ज्या लोकांची ऐपत नाही अशी लोकं शासकीय रुग्णालयात दाखल होतात. ईथे मात्र त्यांना सुकामेवा, आरोग्यदायी वस्तू ह्रया मिळणं शक्य होत नाही. ही समस्या लक्षात घेता आ.संजय राठोड यांनी अशा गरजु रूग्णांना सुकामेवा व आरोग्यदायी वस्तुंचे वाटप करण्याचा निर्णय घेतला. दारव्हा येथे सद्या उपजिल्हा रुग्णालय मधील ट्रामा केअर, कविता मंगल कार्यालय, व निधी मंगल कार्यालय असे तीन कोवीड सेंटर आहेत. येथे रुग्णांना सकाळच्या नाश्त्यापासून तर रात्रीच्या जेवनापर्यंत सोयी उपलब्ध करून दिल्या जातात. परंतू या रुग्णांची प्रतिकार शक्ती कमी होत असल्यामुळे यांना काजु, बदाम, अक्रोड, मनुका असे जिवनसत्व पुरविणारे खाद्य पदार्थ शिवाय स्वच्छतेचे साधन. साबन, तेल, पाऊडर,
प्रोटीन्स व सेनिटायझर अशा विविध वस्तुंचे वाटप आ.संजय राठोड यांच्या तर्फे दारव्हा शहरातील तीनही सेंटरला पुरविण्यात आले. यावेळी
मनोज सिंगी, तालुका प्रमुख, सभापती सुनिताताई राऊत, उपसभापती नामदेव जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी, डॉ.मुकेश खांदवे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रमसिंह कदम, गटविकास अधिकारी, राजीव शिंदे, बांधकाम सभापती अरविंद निंबर्ते, पाणी पुरवठा सभापती प्रकाश दुधे, नगरसेवक प्रकाश गोकुळे, प्रेमसिंग चव्हाण, चेतन करोडदेव, राम मते, प्रा.किश़ोर
राठोड, धनंजय ईरवे, बंडु काने, पांडुरंग तिरमारे व शिवसैनिक उपस्थित होते.
दैनिक शिवस्वराज्य वेब पोर्टल साठी जिल्हा तालुका तसेच गाव पातळीवर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे तरी इच्छुकांनी 9022324656 या नंबरवर संपर्क साधावा.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा