महाराष्ट्र
गारगोटी मधील सहयोग फौंडेशन तर्फे पेट्रोल दर वाढीला एक अनोखी चपराक 1 लिटर पेट्रोल पाठीमागे 30 रुपयांची सवलत
भुदरगड प्रतिनिधी: चेतन शिरसेकर
गारगोटी मधील सहयोग फौंडेशन चे अध्यक्ष माननीय सुशांत सर्जेराव माळवी यांच्या वाढदिवसानिमित्त एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला संपूर्ण देशामध्ये असणारी पेट्रोल दरवाढ आणि त्यामुळे निर्माण झालेली महागाई यामुळे सर्वसामान्य माणूस आज मेटाकुटीला आलेला आहे आणि त्याचाच संदर्भ घेत सुशांत सर्जेराव माळवी यांच्या वाढदिवसानिमित्त स्वखर्चाने वाढणाऱ्या पेट्रोल दर वाढीला चपराक देण्यासाठी 1 लिटर पेट्रोल पाठीमागे 30 रुपयांची सवलत देण्यात आली याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी पेट्रोल दरवाढ ही केंद्र सरकारची सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडणारी एक निर्णय आहेत अशी प्रतिक्रिया व्यक्त होत होती सर्वसामान्य जनतेला पेट्रोल सत्तर रुपये मध्ये मिळत होते याची आठवण या निमित्ताने सर्वसामान्य जनतेला झाली या अनोख्या उपक्रमात सर्वसामान्य जनतेने पेट्रोल दरवाढी बद्दल निराशा व्यक्त केली
यावेळी यावेळी शेती बाजार उत्पन्न समितीचे संचालक सचिन दादा घोरपडे,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शामराव दादा देसाई, प्रहार संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र मुगडे गारगोटी चे माजी सरपंच राजू काझी गारगोटीचे माजी डे. सरपंच मोहन शिंदे
धनाजी कुरळे, पांडुरंग मगदूम,बाळासाहेब देसाई सर , अमोल पाटील ,
सहयोग फाउंडेशन चे उपाध्यक्ष प्रथमेश मालंडकर, सचिव रोहित तांबेकर खजानिस गौरव पाटील, सौरभ पोतदार, नितीन चौगुले, संजय पाटील,शरद मानगावकर, अमित बाबर, संपन्न माळवी, सिद्धेश केसरकर, इंद्रसेन केसरकर, रोहित भांडवले, शंभुराजे चव्हाण, दिगंबर सुतार रमेश बोटे,उपस्थित होते.
Previous article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा