दापोली आगारातून 14 जून पासून विविध मार्गांवर एस.टी.च्या फेऱ्या - दैनिक शिवस्वराज्य

दापोली आगारातून 14 जून पासून विविध मार्गांवर एस.टी.च्या फेऱ्या


राकेश कोळी :-

दापोली आगारातून दि. 14 जून पासून प्रवाशांच्या सेवेसाठी विविध मार्गांवर बसफेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत.
दापोली आगारातून दापोली पुणे सकाळी 7.45 वा. व रात्रौ 9 वा. सुटून परतीच्या प्रवासासाठी पुणे येथून सकाळी 7 वा. व रात्रौ 8.30 वा., दापोली नालासोपारा सकाळी 9.30वा. व रात्रौ 10.15 वा. परतीच्या प्रवासासाठी नालासोपारा येथून सकाळी 8.30 वा. व  रात्रौ 8.30 वा., दापोली बोरीवली दु. 1 वा. व रात्रौ 10 वा. परतीच्या प्रवासासाठी बोरीवली येथून सकाळी 7 वा. व रात्रौ 11 वा., दापोली मुंबई दु. 2 वा. परतीच्या प्रवासासाठी मुंबई येथून सकाळी रात्रौ 10.30 वा. सुटणार आहे.
तसेच दापोली रत्नागिरी सकाळी 6 वा., सकाळी 7 वा. दु.2 वा. परतीच्या प्रवासासाठी रत्नागिरी येथून सकाळी 7 वा. दु. 1.45 वा, सायं. 5 वा. सुटणार आहे. दापोली पाजपंढरी स. 7 वा. स.9 वा., दु. 3.30वा. दापोली हर्णे दु.1 वा., बुरोंडी कोळथरे सकाळी 9.15 वा., दु. 12.30 वा. सायं.3.45 वा., दापोली दाभोळ सकाळी. 6.45, सकाळी 8.30 वा., 9.15 वा. दु. 12.30 वा., दु. 12.45 वा., दु. 3.15वा., सायं. 5.35 वा., दापोली खेड सकाळी 8 वा., दु.12.45 वा., दु.3.15 वा., 5.35 वा., दापोली चिपळूण स.10.30 वा., दापोली मंडणगड सकाळी 8.30 वा., दु. 1.30वा., दापोली कर्दे स.7 वा., दु.12 वा., दापोली मुगीज स.7 वा., साय. 4 वा., बेजेवाडी स.10 वा., दापोली केळशी सकाळी 8 वा., दु.3 वा., दापोली उंबरघर सकाळी 7 वा., भडवळे दु. 11.30वा., सायं. 4 वा., ताडील कोंगळे सकाळी 8 वा., उन्हवरे सकाळी 10.15 वा., उंबरघर सायं. 3 वा., दापोली पांगारी स. 8.30 वा. दापोली पांगारी दु. 3.30वा., दापोली पाटीलवाडी स.9 वा., दु. 2 वा. सुटणार आहेत. प्रवाशांनी सदर सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन दापोली आगाराकडून करण्यात आले आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads