दिलासादायक : कोरोना मृतांच्या आकड्यात मोठी घट; मागील 61 दिवसातील सर्वात कमी आकडा - दैनिक शिवस्वराज्य

दिलासादायक : कोरोना मृतांच्या आकड्यात मोठी घट; मागील 61 दिवसातील सर्वात कमी आकडा



प्रतिनिधी:रविना यादव.

 काल 62 हजार 375 नवीन संक्रमितांची वाढ तर 88 हजार 421 रुग्णांची कोरोनावर मात

आपल्यासाठी एक मोठा दिलासा देणारी बातमी आहे. गुरुवारी देशभरात 62,375 रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, तर 1590 रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा मागील 61 दिवसातील सर्वात कमी आहे. दरम्यान, 88,421 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

देशातील कोरोनाची आकडेवारी

मागील 24 तासात नवीन संक्रमित आढळले: 62,375
मागील 24 तासात ठीक झालेले रुग्ण: 88,421
मागील 24 तासातील मृत्यू: 1,590
आतापर्यंतचे एकूण संक्रमित: 2.97 कोटी
आतापर्यंत ठीक झालेली रुग्णसंख्या: 2.85 कोटी
एकूण मृत्यू: 3.83 लाख
सध्या उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या: 7.93 लाख.

प्रमुख राज्यातील परिस्थिती

 महाराष्ट्र

गुरुवारी 9,830 संक्रमित आढळले तर 5,890 रुग्ण ठीक झाले. दरम्यान, 636 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या 1.39 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहे.
 
छत्तीसगड

राज्यात गुरुवारी 590 रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर 1,027 रुग्णांनी कोरोनावर मात केली. यादरम्यान 7 रुग्णांचा मृत्यूही झाला. सध्या राज्यात 10,682 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

. गुजरात

राज्यात गुरुवारी 283 नवीन संक्रमित आढळले तर 770 रुग्ण ठीक झाले. यादरम्यान, 6 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यात 7,749 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

उत्तर प्रदेश

येथे गुरुवारी 275 रुग्ण आढळले, तर 685 रुग्ण ठीक झाले. यादरम्यान 67 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यात 6,019 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 राजस्थान

गुरुवारी 205 रुग्ण आढळले तर 895 ठीक झाले. यादरम्यान 10 रुग्णांचा मृत्यूही झाला. सध्या राज्यात 4,262 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 दिल्ली

दिल्लीत गुरुवारी 158 रुग्ण आढळले, तर 343 रुग्ण ठीक झाले. यादरम्यान 10 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यात 2,554 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads