Blog
स्पर्धक क्रमांक १२० सिद्धी रवींद्र गोसावी सिंधुदुर्ग
राजा शिवछत्रपती
"प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ।।
शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।"
जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते
भल्या भल्यांची मती अरे मरणाची कुणाला भिती आदर्श आमचे शिवछत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण,छ-छत्तीस हत्तींचे बळ असणारे, त्र-त्रस्त मोघलांना करणारे, प-परत न फिरणारे, ती-तिन्ही जगात जाणणारे, शि-शिस्तप्रिय, वा-वाणिज्यतेज, जी-जिजाऊंचे पुत्र, म-महाराष्ट्राची शान, हा-हार न मानणारे, रा-राज्याचे हितचिंतक, ज-जनतेचा राजा.
स्वताच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भिती कधीच वाटत नाही. असेच आपले छत्रपती शिवाजी महाराज होते. विजेसारखी तलवार चालवली, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवले, वाघ नख्याने अफजलखानाचा कोतळा फाडला. असा मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला.ओम बोल्याने मनाला शांती मिळते, साई बोल्याने मनाला शक्ती मिळते, राम बोल्याने पाप मुक्ती मिळते, पण जय शिवराय बोल्याने शंभर वाघांची ताकद मिळते.याच कारण एकच शिवाजी महाराजांचे पराक्रम, कर्तुत्व, सळसळते रक्त, साहस.त्यांना भिती नव्हती कुणाची, ना चिंता होती परिणामांची. कारण त्यांच्यावर शिकवण होती आई जिजाऊंची. त्यांची जात होती मर्द मराठ्यांची, म्हणूननच तर त्यांनी मुहूर्तमेढ रोवली स्वराज्याची.महाराष्ट्र आपला अंधारात होता,औरंगजेबाच्या विळख्यात भवानी माता अडकली होती. तेव्हा घेतला एका प्रकाशाने जन्म शिवनेरी हि झाला धन्य.त्या प्रकाशाचे नाव होते शिवाजी. होते त्यांच्यावर जिजाऊंचे संस्कार आणि पाठीवर दादोजींचा हात.डोक्यावर जिरेटोप व हातात भवानीची तलवार, स्वराज्याचा पाया घातला छातीवर शोषून वार.माझवुन रणदुंदुभी रणांगणात खेचून आणला विजय त्यांनी आपल्या अंगणात. त्यांनी आकाश जिंकून घेतले, दुर्ग जिंकून घेतला, एवढेच नव्हे तर विशाल सागराला पायबंद घालून आमचा सिंधुदुर्ग बांधला.एक दिवशी त्यांची नजर पडली सिद्दीच्या जंजिरावरी, केली त्यांनी नऊ वेळा स्वारी पण अपयश पडले पदरी, सांगा असेल का दुख या परी? पण थांबले नाही ते, झुकले नाही ते, पेटुन उटले आणि भिडले थेट मोघलांना, आव्हान दिले डच पोर्तुगीजांना, अंगावर घेतले ब्रिटिशांना शेवटी मराठ्यांचा राजा तो पुरुन उरला सगळ्यांना.दख्खनच्या भूमीत बसून दिल्ली चे तख्त हलवले आणि उडवली दाणादाण औरंगजेबाची म्हणूननच त्यांचे नाव छत्रपती शिवाजी.शेवटी एवढेच म्हणेन, हातात धरली तलवार छातीत भरले पोलाद धन्य धन्य हा महाराष्ट्र, धन्य धन्य आपले महाराज.
Previous article
Next article
Nice one's 👍👍
उत्तर द्याहटवाnice
उत्तर द्याहटवा
उत्तर द्याहटवा👏🙌🙌
Mst👍👍
उत्तर द्याहटवाChan 👌👌
उत्तर द्याहटवाBhari
उत्तर द्याहटवा