वळण रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटले कार झाली पलटी - दैनिक शिवस्वराज्य

वळण रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटले कार झाली पलटी



सेलु तालुका प्रतिनिधी अमोल शिंदे 

 औरंगाबाद ते जिंतुर महामार्गावरील देवगाव फाटा गुरूध्वार जवळ झाला अपघात.28 जुन रोजी दुपारी दोन वाजायच्या सुमारास घटना  घडली.  देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा सुरेश पवार, गजानन शिंदे, पवन शिंदे, अजय पवार हे एमएच 21 सी.2597 ह्या  इंडिका कारने जिंतुरकडे जात असताना. देवगाव फाटा गुरूध्वार जवळ भरधाव वेगाने चालणारी इंडिका कार वरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या कडेला जाऊन घसरली. अपघातात गंभीर  जखमी  गजानन शिंदे ह्याना पोलिस निरीक्षक बळंवत  जमादार, पोलिस कर्मचारी महेश पांगरकर,भानुसे, मंठा येथील शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.कारमधील बाकिच्यांना मात्र दुखापत झाली.

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads