आमदार योगेश कदम यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न - दैनिक शिवस्वराज्य

आमदार योगेश कदम यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न


राकेश कोळी उपसंपादक :-

दापोली विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार योगेश कदम यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र शासनाच्या वतीने दापोली विधानसभा मतदार संघात  काहीच दिवसांपूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्र आंबवली ता. खेड प्राथमिक आरोग्य केंद्र फणसु ता. दापोली, केळशी ता दापोली, देव्हारे, तालुका मंडणगड  या प्राथमिक आरोग्य केंद्राना रुग्णवाहिका दिल्या, तसेच कुंबळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आखतीयारात येणाऱ्या सर्व ग्रामपंचायत सरपंच यांनी आमदार योगेश कदम यांच्याकडे नवीन रुग्णवाहीका मिळावी अशी  मागणी केली होती. आमदार योगेश कदम यांनी लवकरच कुंबळे येथे देखील रुग्णवाहिका मी मंजूर करून आणेन असा शब्द दिला होता व त्याची आज पूर्तता देखील केली. सदर रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा आमदार योगेश कदम यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे आयोजक निमंत्रक ग्रामपंचायत कुंबळेचे  कार्यसम्राट सरपंच किशोरजी दळवी यांच्या शुभ हस्ते रुग्णवाहिकेचे श्रीफळ फोडून करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना सरपंच किशोर दळवी म्हणाले की, देव्हारे पाठोपाठ कुंबळे प्राथमिक आरोग्य केंद्रालाही रुग्णवाहिका मिळावी अशी मागणी मी स्वतः आमदार योगेश कदम यांच्याकडे केली व थोडयाच दिवसात आमदार साहेबांनी सदरची रुग्णवाहिका मंजूर करून आज तिचा लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे. श्रेय घेण्यासाठी काल घाई गडबडी मध्ये काही लोकांनी लोकार्पण केले, ही अशी लोक की प्राथमिक आरोग्य केंद्र कुंबळे यांच्याशी त्यांचा काडीचाही संबंध नाही. पण आजचा शासकीय लोकार्पण सोहळा बघा 2 दिवस आधी निमंत्रण फलक आहेत. सर्व सरपंच आहेत ज्यांची आग्रही मागणी होती असे सर्व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ यांच्या प्रमुख उपस्थित मध्ये सदरचा सोहळा आयोजित केला असून स्वतः तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर भावतनकर देखील आजच्या कार्यक्रमास उपस्थित आहेत. मागील आठवड्यात मंडणगड तालुक्यातील  सर्वात मोठे प्राथमिक आरोग्य केंद्र असलेले देव्हारे लोकांच्या मागणी नुसार रुग्णवाहिका दिली. त्याच दिवशी आमदार साहेब यांनी जाहीर केले की लवकरच कुंबळे प्राथमिक आरोग्य केंद्राला देखील रुग्ण वाहिका देणार आहे. तिचे देखील लोकार्पण लवकरच होईल आणि आमदार साहेब यांनी दिलेला शब्द पाळला व आज या ठिकाणी कुंबळे प्राथमिक आरोग्य केंद्राला आज रुग्ण वाहिका दिली त्याबद्दल आभार मानले.
यावेळी आमदार योगेश कदम यांनी मनोगत व्यक्त करताना श्रेय घेण्यासाठी हा लोकार्पण सोहळा आयोजित केला नसून  कोरोना महामारीत काही दिवसांपूर्वी मी सगळ्या प्राथमिक आरोग्य केंद्र यांना भेट दिली असता, सगळ्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिकेची मागणी आली. कारण प्रत्येक प्रा आ केंद्रात 15 ते 20 वर्षे जुन्या असलेल्या रुग्णवाहिका आहेत. सर्व प्रथम डोंगराळ व दुर्गम भागात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राना प्राधान्य दिले. म्हणून पहिले मी प्राथमिक आरोग्य केंद्र देव्हारे निवडले व त्यांस रुग्णवाहिका दिली. त्यावर अनेक लोकांनी राजकारण केले रुग्णवाहिका चोरीला गेली. कुंबळे सुद्धा माझ्या मतदार संघात येते मी या मतदार संघाचा पालक म्हणून मला या गोष्टी समजतात, मला राजकारण करायचे नसून जनतेची विकास कामे करायची आहेत. मंडणगड मधील आरोग्य सुविधेवर माझा भर असेल. कोरोना महामारीत अनेक सुविधा अपुऱ्या आहेत. सर्वात दुर्गम भाग मंडणगड तालुका असून मी या मतदार संघाचा पालक म्हणून सदैव तत्पर असेन. दुसऱ्या लाटेत प्रचंड रुग्ण सापडले असून, काय गरजेचे आहे काय उपाय योजना केल्या पाहिजेत याचा पूर्णतः अभ्यास मी केला त्यात ऑक्सिजन बेड साठी काय करू शकतो याचे देखील नियोजन करून आज ऑक्सिजन बेड उपलब्ध करून दिले. तसेच माझ्या मतदार संघात माझ्या आमदार स्थानिक विकास निधीतून 50 ऑक्सिजन concentretor देखील उपलब्ध केले आहे ग्रामीण रुग्णालय येथे व सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राना ऑक्सिजन सिलेंडर दिले आहेत. मला राजकारण करायचे नाही मी जनसेवेचा वसा घेतला असून मला मंडणगड तालुक्याला पुढे नायचे आहे.3 व्हेंटिलेटर सन्मा मंत्री आदित्यजी ठाकरे साहेब यांनी दापोली मतदार संघाला दिले असून ते आजच उपलब्ध होईल. शिवसेना नेते पर्यावरण मंत आदित्य साहेब ठाकरे यांच्या माध्यमातून मंडणगड तालुक्यासाठी आज एक व्हेंटिलेटर उपलब्ध होईल. कुंबळे ग्रामपंचायत सरपंच किशोरजी दळवी, शिरगांव ग्रामपंचायत सरपंच विश्वनाथजी सावन्त दहागाव सरपंच मयुरी ताई सावन्त, तीडे प्रभारी  सरपंच सिद्धेश पांढरे, कादवण सरपंच राजेंद्र सोंडकर, वलौते सरपंच चेतन चव्हाण, भोळवली सरपंच रणजित कासारे, पिंपळोली प्रज्ञा मालुसरे, दाभाट सरपंच सुषमा ताई कासारे सडे सरपंच कविता ताई जगताप,उपसरपंच पूजा लांबे, रवि दळवी, म्हाप्रळ उपसरपंच अजहर मुकादम यांच्या प्रमुख उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला. सदर कार्यक्रमास रत्नागिरी जिल्हा परिषद कृषी व पशु संवर्धान सभापती सौ रेश्मा ताई झगडे, माजी आरोग्य बांधकाम सभापती श्री अण्णा साहेब कदम,  शिवसेना मंडणगड तालुका प्रमुख प्रतापजी घोसाळकर,मुंबई प्रमुख सल्लागार शिवसेना दिपकजी सोंडकर, मंडणगड पंचायत सभापती सौ स्नेहल ताई सकपाळ,माजी सभापती श्री आदेशजी केणे, उपतालुका प्रमुख हरिश्चंद्र कोदेरे, सुरेश दळवी, उप उपविभाग प्रमुख पांडुरंग माने,दयानंद येसरे,शहर प्रमुख विनोद जाधव माजी उपतालुका प्रमुख दोस्त महम्मद चोगले,महिला तालुका संघटक सौ अमिता ताई शिंदे,उपतालुका संघटक सौं समीक्षा ताई लोखंडे, विभाग संघटक सौ सुप्रिया ताई धोंडगे, माजी उपविभाग प्रमुख गजानन तांबुटकर, सल्लागार भगवान मोरे, शिवसैनिक मदन दळवी,संजय साळवी, धनंजय करमरकर शिवसेना तालुका सचिव सिद्धेश देशपांडे  युवासेना उपजिल्हाधिकारी चेतन सातोपे,  प्रभारी तालुका अधिकारी जितेंद्र पाटील, तालुका समनवक निलेश मोरे,तालुका युवासेना सचिव प्रतीक पोतनीस, उपतालुका अधिकारी राकेश गायकवाड  विभागधिकारी देवीचंद गणवे, संदेश लोखंडे अनिल लोखण्डे हरेश दळवी, सर्व शाखा प्रमुख ग्रामस्थ व  तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ भावटनकर,वैद्यकीय अधिकारी डॉ भगवान पितळे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads