महाराष्ट्र
दोन महिन्यात ३ हजार बालके कोरोना बाधित, रत्नागिरी जिल्ह्यातील धक्कादायक माहिती
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यापुर्वीच तिसऱ्या लाटेने धडक दिली की काय? असा प्रश्न जिल्हा वासियांसमोर उभा आहे. गेल्या दोन महिन्यांत तब्बल ३ हजार बालके बाधित झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. यातील ३ बालके ही डेल्टा प्लसने बाधित झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांच्याकडून मिळत आहे.
व्हेरिएंट ऑफ कन्सर्न (डेल्टा प्लस) ची धास्ती संपूर्ण जगणे घेतली आहे त्या विषाणूच्या नव्या प्रकाराने रत्नागिरीतील ३ बालके यापूर्वीच बाधित झाली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी दिली आहे. त्यामुळे केवळ प्रशासनाचं नव्हे तर जनतेनेही सतर्क होणे आवश्यक झाले आहे. जिल्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतच असताना तिसरी लाट जिल्ह्यात आली कि काय असा प्रश्न उपस्थित करणारे आकडे समोर येत आहेत. तिसरी लाट ही लहान मुलांसाठी धोकादायक असताना आतापर्यंत दोन महिन्यात जिल्ह्यातील ३ हजार बालके कोरोनाने बाधित झाल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. विशेष म्हणजे ज्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रत्नागिरी जिल्ह्यात मागील दोन महिन्यात तब्बल 25 हजारहून अधिक रुग्ण बाधित झाले असून त्यामध्ये तीन हजार मुलांचा समावेश आहे. या मुलांमध्ये व्हेरिएंट ऑफ कन्सर्न (डेल्टा प्लस) स्ट्रेनची तीन बालके सापडली होती. ही तीनही मुले बरी होऊन घरी परतली आहेत. एप्रिल आणि मे या दोन महिन्यात जिल्ह्यात 2 हजार 908 मुलांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. यामध्ये 0 ते 18 वर्षांपर्यंतच्या मुलांचा समावेश होता. फक्त जून महिन्यातच 70 ते 80 मुले कोरोना बाधित होती. या मुलांमध्ये सर्दी, ताप, अशी लक्षणे आढळून आली. या मुलांमध्ये एका दहा वर्षाच्या मुलाला मात्र प्राण गमवावे लागले आहेत. या आकडेवारीवरूनच जिल्ह्यातील बालके कोरोनाच्या विळख्यात येताना दिसत आहेत. खेडमध्ये ही एकाच घरातील चार बालकांना कोरोनाची लागण झाल्याची बाब नुकतीच समोर आली आहे. या कोरोनाच्या महामार्ग समाधानकारक गोष्ट म्हणजे मुलांमध्ये चांगली रोग प्रतिकारक्षमता असल्याने या सर्व मुलांनी कोरोनावर मात केली आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा