महाराणी अहिल्यादेवी मंचाच्या पाठपुराव्याला यश,भराडे धनगरवाडी रस्त्यावरील दगडी बांध जि. प. ने काढून टाकला - दैनिक शिवस्वराज्य

महाराणी अहिल्यादेवी मंचाच्या पाठपुराव्याला यश,भराडे धनगरवाडी रस्त्यावरील दगडी बांध जि. प. ने काढून टाकला


राकेश कोळी उपसंपादक :-

धनगर समाजाच्या महि‌लेने उच्च वर्णीय समाजाच्या विरोधात ग्रा. प. निवडणुक लढविल्याने गावातील काही प्रतिष्ठीत गांव पुढाऱ्यांनी मनात राग ठेऊन भराडे धनगरवाडी‌ला जोडणारा रस्ता निवाचीपट्टी जवळ दिनांक ७ मार्च २१ पासून  दगडीबांध घालून अडविला होता. रस्ता अडविल्याने खेड तालुक्यातील भराडेवाडी येथील धनगर बांधव घाबरतील व आपल्याला शरण येतील असा गांव पुढाऱ्यांचा अंदाज होता.
महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच,रत्नागिरी या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वाडीतील ग्रामस्थांना धीर देऊन स्वत: रस्ता खुला करून देण्याची जबाबदारी स्विकारली होती. शासनाकडे सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा केला. कोरोना लॉगडाऊन मुळे प्रशासकीय कार्यवाही होण्यास थोडा उशीर झाला. मात्र खेड तालुक्याच्या कार्यक्षम तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी प्राजक्ता घोरपडे मॅडम यांनी दिनांक २१ जून २१ रोजी सकाळी ११ वा पहिली सुनावणी लावली होती. या सुनावणी साठी रस्त्यावर दगडी बांध घालणारे संतोष यादव. जि प बांधकाम उप अभियंता मंगेश खेडेकर, ग्रामपंचायत घेरारसाळगड चे ग्रामसेवक,सरपंच व महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र आखाडे यांना नोटीस बजावून निमंत्रित करण्यात आले होते. या सुनावणीत सदर रस्ता जिल्हा परिषदेच्या मालकीचा असल्याने व यापुर्वी शासकीय निधी खर्च झाल्याने जि प बांधकाम विभागाने तात्काळ रस्त्यावरील दगडी बांध हटवून हा रस्ता नागरीकांना वापरासाठी मोकळा करून द्यावा असा आदेश मा. तहसिलदारांना जि प बांधकाम विभागाला दिला. दिनांक २१ जून रोजीच्या सुनावणीत मा. तहसिलदारांनी दिलेल्या आदेशाचे जि प बांधकाम विभागाने जबाबदारीने पालन करून दिनांक २२ जून रोजी मा. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, कोतवाल ग्रामपंचायत घेरारसाळगड यांच्या साक्षीने भराडे धनगरवाडी जोड रस्त्यावरील दगडी बांध हटवून रस्ता नागरीकांना वाहतुकीसाठी मोकळा करून दिला आहे. रस्त्यावरील दगडी बांध हटवल्याने भराडे धनगरवाडीतील नागरीकांनी प्रशासनाचे व महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, रत्नागिरी या संघटनेचे विशेष आभार मानले आहेत. तसेच हा संघर्ष लढण्यास भराडे धनगरवाडीतील ग्रामस्थांनी सयंम ठेवून व एकजुटीने संघटनेला साथ दि‌ल्याबद्दल संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र आखाडे यांनी भराडे धनगरवाडीतील सर्व समाज बांधवांचे आभार मानले आहेत.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads