महाराष्ट्र
दत्तक घेतलेल्या सा॓रगीला समाजवादी प्रबोधीनी कडून आर्थीक मदत
कागल तालुका प्रतिनिधी : दिलीप भारमल
काही दिवसांपूर्वी मुरगूड येथील रिक्षाचालक सुभाष धुमाळ यांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यांना अपत्य नसल्याने त्यांनी सारंगी नावाच्या एका अनाथ मुलीला दत्तक घेतले होते. हातावरचे पोट असून देखील त्यांनी आपल्यापरीने सारंगीला जिवापाड जपले होते. पण काही दिवसांपूर्वी धुमाळ यांचा कोरोनाने मृत्यू झाला आणि सारंगी पुन्हा वडिलांच्या प्रेमाला पोरकी झाली.
धुमाळ कुटुंबांवर अशी बिकट परिस्थिती ओढवाल्याने समाज माध्यमातून या मुलीला मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. समाजवादी प्रबोधीनी शाखा मुरगुड यांच्या वतीने सा॓रगी साठी 10000 रु प्रबोधीनीचे अध्यक्ष काॅ.बबन बारदेस्कर मा.अध्यक्ष बी.एस खामकर , तर संस्थापक अध्यक्ष डी.डी चौगले सर याच्या वतीने देण्यात आले त्यांच्या या सहकार्याबद्दल दातृत्वाचे परिसरातून कौतुक होत आहे
सारंगीला रोख 10000रु मदत देताना अध्यक्ष काॅ.बबन बारदेस्कर,बी.एस खामकर, पत्रकार समीर कटके ,राजु चव्हाण ,संजय घोडके, रणजीत कदम,राहुल कांबळे आदी उपस्थित होते.
Previous article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा