राशिभविष्य
आजचे राशिभविष्य ०२-०७-२०२१
आजचे राशिभविष्य ०२-०७-२०२१
मेष :-
आज धार्मिक- आध्यात्मिक कल राहील . द्विधा मनामुळे ठोस निर्णय घेऊ शकणार नाही . पैशाची देवाण - घेवाण व आर्थिक व्यवहार न करण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत . शारीरिक - मानसिक बेचैनी राहील . धार्मिक कार्यावर पैसा खर्च होईल . विदेशातील स्नेह्यांकडून बातम्या प्राप्त होतील .
वृषभ :-
व्यापारात वृद्धी होण्याबरोबरच व्यापार विषयक सौदे लाभदायक ठरतील . उत्पन्नाच्या साधनांत वाढ होईल . वडीलधारे आणि मित्र यांच्याकडून लाभ आणि सुखद क्षण लाभतील . दांपत्य जीवनात सुख समाधान मिळेल . पर्यटनाचे बेत आखाल . महिला वर्गाकडून लाभ होतील व मान - सन्मान मिळेल . विवाहाचे योग आहेत . संततीकडून शुभवार्ता मिळतील .
मिथुन :-
शारीरिक व मानसिक सुख मिळेल . नोकरी- व्यवसायात आपल्या श्रमाचे चीज होत आहे असे वाटेल . अधिकारी प्रोत्साहन देतील . त्यामुळे आपला माह वाढेल . सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल . कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील . पित्याकडून लाभ होईल . सरकारी काम पूर्ण होण्यात अडचणी राहणार नाहीत . दांपत्यजीवनात सुख , आनंद मिळेल असे श्रीगणेश सांगतात .
कर्क :-
श्रीगणेश सांगतात की आज भाग्योदया बरोबरच अचानक धनलाभ होईल . विदेशी जाण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील . विदेशातून सुवार्ता मिळतील . धार्मिक कार्य किंवा यात्रा यावर खर्च होईल . कुटुंबीय आणि पदाधिकारी यांच्या समवेत दिवस सुखकारक राहील . नोकरदारांना पण लाभ मिळेल .
सिंह :-
आज तब्बेतीकडे लक्ष पुरवावे लागेल . तब्बेतीसाठी खर्च करावा लागेल . निषेधार्ह विचार आपणाला चुकीच्या मार्गावर नेणार नाहीत याची काळजी घ्या . घरातील व्यक्तींशी मतभेद होतील . अनैतिक कामामुळे बदनामी होण्याची शक्यता आहे . इष्ट देवतेचे नामस्मरण आणि आध्यात्मिक विचार आपणाला योग्य मार्गदर्शन करतील .
तूळ :-
श्रीगणेशांच्या मते आज सामान्यतः तब्बेत चांगली राहील . आजारी व्यक्तींना पण आराम वाटेल . घरातील सुख शांतीच्या वातावरणात वेळ घालवाल . कामात सफलता आणि यश मिळाल्याने उत्साह वाढेल . नोकरीत लाभदायक बातमी मिळेल आणि सहकाऱ्यांचे चांगले सहकार्य मिळेल . मैत्रिणींशी मुलाखात होईल . विरोधक व प्रतिस्पर्धी यांना पराभूत कराल .
कन्या :-
श्रीगणेश कृपेने दांपत्य जीवनात सुखाचे क्षण अनुभवाल . सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात सन्मान व प्रतिष्ठा लाभेल . मनोरंजनाच्या कार्यक्रमात भाग घ्याल . वस्त्रे , अलंकार , इ . खरेदी होईल . भिन्नलिंगीय व्यक्तीची ओळख प्रणयात परिवर्तित होईल . व्यापारात भागीदारांबरोबर चांगले संबंध राहतील . धनलाभ होईल .
वृश्चिक :-
आज यात्रा प्रवासाचे आयोजन न करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात . तब्बेतीची काळजी राहील . संतती विषयक समस्या निर्माण होतील . मानभंग होणार नाही याची काळजी घ्या . आर्थिक नियोजनासाठी वेळ चांगली आहे . बौद्धिक चर्चा किंवा वादविवाद यात भाग न घेण्याचा सल्ला श्रीगणेश देतात . शेअर- सट्टा यांचे आकर्षण हानी करेल .
धनु :-
श्रीगणेश सांगतात की आज जास्त संवेदनशीलते मुळे घरगुती गोष्टींत मानसिक तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे . द्विधा मनःस्थिती मुळे मनात चलबिचल वाढेल . तब्बेतीच्या दृष्टीने पण दिवस चांगाल नाही . आईच्या तब्बेती विषयी विशेष खबरदारी घ्यावी लागेल . निद्रानाशाचा त्रास होईल . जलाशयापासून जपून राहणे हिताचे ठरेल .
मकर :-
आज आपण डावपेचातून शत्रूला पराभूत कराल . नवीन कार्यारंभासाठी तयार राहा . सफलता मिळेल . प्रत्येक काम जीव लावून कराल . व्यापार धंद्यात लाभ होईल . शेअर- सट्टायात गुंतवलेले पैसे लाभ देतील . मित्र , स्वकीय आणि भावंडे यांच्याशी चांगले मेतकूट जमेल . मनाची तगमग दूर होईल . विद्यार्थ्यांना सिद्धी प्राप्त होईल . श्रीगणेशाची आपणावर कृपा राहील .
कुंभ :-
श्रीगणेश सांगतात की द्विधा मनःस्थिती मुळे कोणताही ठोस निर्णय घेऊ शकणार नाही . महत्वाचे निर्णय घेऊ नका . वाणीवर ताबा न राहिल्याने पील व्यक्तीशी मतभेद होतील . धार्मिक कार्यावर खर्च होईल . तब्बेत बिघडेल . विद्यार्थ्यांना मध्यम दिवस . नकारात्मक विचार दूर करा असे श्रीगणेश सांगतात .
मीन :-
आनंद , उत्साह व प्रसन्न तन - मन यामुळे आज चैतन्य आणि स्फूर्तीचा संचार होईल . नवीन कामे हाती घ्याल . त्यात यश मिळेल . धार्मिक- मंगल कार्याला हजेरी लावाल . एखादा निर्णय घेताना मनस्थिती द्विधा झाली तर तो निर्णय स्थगित ठेवा असे श्रीगणेश सांगतात . कुटुंबीयांसह मिष्ठान्नाचा आस्वाद घ्याल . प्रवास होईल . दांपत्यजीवनात आनंद वाटेल .
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा