जि.प. उर्दू प्राथमिक शाळा सिध्दापूर येथे शिक्षण विस्तारअधिकरी व केंद्रप्रमुखांची भेट - दैनिक शिवस्वराज्य

जि.प. उर्दू प्राथमिक शाळा सिध्दापूर येथे शिक्षण विस्तारअधिकरी व केंद्रप्रमुखांची भेट


सलीम शेख मंगळवेढा तालुका प्रतिनिधी :-

मंगळवेढा :- दि  29/07/2021 वार गुरुवार रोजी जि. प. प्रा. उर्दू शाळा सिध्दापूर येथे शिक्षण विस्तार अधिकारी मा श्री पांढरे बी डी व केंद्रप्रमुख मा श्री कुलकर्णी पी डी यांनी अचानक भेट दिली. संपूर्ण शालेय कामकाजाची पहाणी करून कामकाज समाधान कारक असल्याचे मत व्यक्त केले व त्यांनी मुख्याध्यापक व सर्व शिक्षक स्टॉप चे कौतुक केले. बोराळे केंद्रातील पहिली तंबाखूमुक्त शाळा घोषित झालेबददल मुख्याध्यापक व सर्व शिक्षक स्टाफचे आभिनंदन केले.
यावेळी साहेबांच्या उपस्थितीत सिद्धापूर गावातील शिक्षणप्रेमी व समाज सेवक ताज सोशल ग्रुपचे अध्यक्ष श्री निसारभाई शेख यांनी शाळेला चार ट्री गार्ड सप्रेम भेट दिली.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads