डी आर शाळेत गुरुपौर्णिमा साजरी - दैनिक शिवस्वराज्य

डी आर शाळेत गुरुपौर्णिमा साजरी


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी दिनेश वाडेकर :-

नंदुरबार शहरातील डी आर हायस्कूल नंदुरबार मध्ये गुरुपौर्णिमा व लोकमान्य टिळक जयंती साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे पर्यवेक्षक पंकज पाठक, व प्रमुख वक्ते शाळेचे उपमुख्याध्यापक  नारायण भदाणे  तर व्यासपीठावर मुख्याध्यापक  प्रकाश पिंपळे,पर्यवेक्षक श्रीराम मोडक, लायन्स क्लब अध्यक्ष कोतवाल शेखर, सचिव राहुल पाटील, खजिनदार निमेश गोसलिया, लायनेस क्लब अध्यक्षा सुप्रिया कोतवाल,  लायन्स फेमिना अध्यक्षा हिना रघुवंशी सचिव सीमा मोडक मान्यवर उपस्थित होते. वरील कार्यक्रमाच्या निमित्ताने  घेण्यात आलेल्या वक्तृत्व  स्पर्धेत  गुणवंत  गिरासे,वेदांत पाटील,मयूर गवते, दर्शील भामरे, कमलेश जोशी, प्रीतम पाटील,मयूर शिवदे आदी विद्यार्थ्यांनी गुरुविषयी आदर व्यक्त केला.वरील स्पर्धेचे परिक्षण दिनेश वाडेकर,अशोक वसईकर यांनी केले. तसेच  वरील कार्यक्रमात ऑनलाइन 87 विद्यार्थ्यांनि सहभागी होऊन  कार्यक्रमात सहभागी झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली भदाणे, प्रास्ताविक शितल जोशी, आभार निलेश गावीत ,तसेच कार्यक्रम यशस्वीतेसाठी उत्सव समिती प्रमुख हेमंत खैरनार, जितेंद्र पगारे, सुनीता बागूल,राजेंद्र लांडगे,जयेश देवरे,प्रशांत पाटील, जयंत लोहार यांनी परिश्रम घेतले.वरील कार्यक्रम  कोरोना चे नियम  सांभाळून करण्यात आला.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads