महाराष्ट्र
हातमाग पदविका प्रवेशासाठी २० ऑगस्टपर्यंत अर्जाची मुदत
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी :-
सोलापूर दि.२७ : केंद्र शासनाच्या भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेतील २०२१-२२ या शैक्षणिक सत्रासाठी तीन वर्षीय हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमासाठी बरगढ (ओडिसा) येथे १३ तर वेंकटगिरी येथे दोन जागेसाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. २० ऑगस्ट २०२१ पर्यंत प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन वस्त्रोद्योग आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केले आहे.
प्रथम सत्रासाठी पात्र उमेदवाराची निवड करण्यासाठी वस्त्रोद्योगचे प्रादेशिक उपायुक्त सोलापूर, नागपूर, मुंबई, औरंगाबाद यांच्यामार्फत प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रवेश अर्जाचा नमुना आणि इतर माहिती प्रादेशिक उपआयुक्त कार्यालय किंवा वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या वेबसाईटवर www.dirtexamah.gov.in उपलब्ध आहे.
इच्छुक उमेदवारांनी परिपूर्ण अर्ज प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग, सोलापूर जिल्हा महसूल कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्था इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, सोलापूर यांच्या कार्यालयात २० ऑगस्ट २०२१ पर्यंत जमा करण्याचे आवाहन प्रादेशिक उपआयुक्त चंद्रकांत टिकुळे यांनी केले आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा